Pakistan Air Strike In Khyber : पाकिस्तानने त्यांच्याच J-17 फायटर जेटद्वारे स्वतःच्याच नागरिकांना ठार मारले! पण अशी वेळ येण्यामागचं कारण काय?

Pakistan Air Strike In Khyber : पाकिस्तानने त्यांच्याच J-17 फायटर जेटद्वारे स्वतःच्याच नागरिकांना ठार मारले! पण अशी वेळ येण्यामागचं कारण काय?

पाकिस्तान नेहमी भारताविरोधात काही ना काही खुरापत करताना दिसतो. मात्र यावेळी पाकिस्तानी आर्मीने मोठी चूक केली आहे. पाकिस्तान आर्मीने स्वतःच्याच नागरिकांवर एअर स्ट्राइक केला.
Published by :
Prachi Nate
Published on

पाकिस्तान नेहमी भारताविरोधात काही ना काही खुरापत करताना दिसतो. मात्र यावेळी पाकिस्तानी आर्मीने मोठी चूक केली आहे. पाकिस्तान आर्मीने स्वतःच्याच नागरिकांवर एअर स्ट्राइक केला. सोमवारी सकाळी खैबर पख्तूनख्वाच्या तिराह वॅलीमध्ये पाकिस्तानी एअर फोर्सने चिनी बनावटीच्या जे-17 फायटर जेटमधून हवाई हल्ला केला, हा हल्ला दहशतवाद्यांना मारण्यासाठी करण्यात आला होता.

मात्र, यात त्यांच्याच 30 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचसोबत 20 पेक्षा जास्त लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत. यात महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. तहरीक ए तालिबानचे दहशतवादी खैबरमध्ये जास्त सक्रीय आहेत. खैबर हे अफगाणिस्तानच्या बॉर्डर जवळ आहे. खैबरमध्ये ऑगस्ट महिन्यात 700 पेक्षा जास्त दहशतवादी हल्ले झाले ज्यात 258 जवान मृत्यूमुखी पावले.

त्यामुळे पाकिस्तानी सैन्याने खैबर बॉर्डरवर स्पेशल अभियान चालवण्याचे ठरवले. यादरम्यान डेरा इस्माइल आणि बाजौर भागात पाकिस्तानी एअर फोर्सने एअर स्ट्राइक केला. या अंतर्गत डेरा इस्माइलमध्ये 7 दहशतवादी मारल्याचा दावा केला आहे.

मात्र या हल्ल्यात पाकिस्तानी नागरिकांचा देखील मृत्यू झाला असून पाकिस्तानने यावर कोणतीच माहिती दिली नाही. खैबर पाकिस्तानातील एकमेवर राज्य आहे, जिथे इमरान खान यांचा पक्ष सत्तेवर आहे. त्यामुळे पाकिस्तान सैन्याने केलेला हा हल्ला खरचं दहशदवाद्यांचा खात्मा करण्यासाठी केला होता की, जाणुनबुजून केला होता. असा प्रश्न उपस्थित होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com