ताज्या बातम्या
Panchayat Season 5 : प्रेक्षकांना बघायला मिळणार आजी-माजी सरपंचांची लढाई; पुढील वर्षात येणार पंचायत 5 सीझन
पंचायत सीझन 5 ची घोषणा नुकतीच झाली असून 2026 मध्ये हा नवाकोरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पंचायत वेब सिरीजचा 4 सीझन नुकताच अॅमेझॉन प्राइमवर दाखल झाला. हा सीझनही प्रेक्षकांना चांगलाच भावला. फुलेरा गावचा सरपंच कोण होणार याचं उत्तर शेवटच्या एपिसोडमध्ये मिळालं. प्रेक्षकांना कहानी में ट्विस्ट पाहायला मिळालं असून सरपंच मंजूदेवी यांना हरवत क्रांतीदेवी यांच्या गळ्यात गावच्या सरपंचपदाची माळ पडली. त्यांची विजयी मिरवणूक गावकऱ्यांसह माजी सरपंच, प्रधान, सचिव, उपसचिवसह सर्वांनीच पाहिली. आता हीच आजी-माजी सरपंचांची लढाई पुढील सीझनमध्येही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पंचायत सीझन 5 ची घोषणा नुकतीच झाली असून 2026 मध्ये हा नवाकोरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.