Amravati Strike News
Amravati Strike News

प्रवेशद्वाराला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या, पांढरी खानमपूरच्या ग्रामस्थांचा ठिय्या, पोलिसांनी केला लाठीचार्ज

पांढरी खानमपूर गावच्या प्रवेशद्वाराला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याच्या मागणीसाठी येथील ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन सुरु आहे.
Published by :

अमरावतीमध्ये खानमपूर ग्रामस्थांनी आंदोलनाच्या घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पांढरी खानमपूर गावच्या प्रवेशद्वाराला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या, या मागणीसाठी या गावातील ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. संतप्त आंदोलकांनी अमरावती विभागीय आयुक्तालयात घुसण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळं अमरावती विभागीय आयुक्तालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलक संतप्त झाल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनाच्या निर्णयानंतर आंदोलनाची दिशा ठरणार असल्याची माहिती समोर आलीय. अमरावतीत आंदोलकांवर लाठीचार्जही करण्यात आला आहे. आंदोलकांकडून दगडफेकही सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. पांढरी खानमपूर गावच्या प्रवेशद्वाराला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याच्या मागणीसाठी येथील ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन सुरु आहे.

"दरवेळी अशाप्रकारच्या घटना समोर येतात, तेव्हा गृहमंत्रालयाला या घटना हाताळता येत नाहीत. अमरावतीमधील सर्व गोष्टी व्यवस्थीत पार पाडण्याची सरकारची आणि गृहखात्याची जबाबदारी आहे. परंतु, लाठीचार्ज करुन आम्ही आंदोलनं मोडीत काढू शकतो, अशीच परिस्थिती आहे. लोक तुमच्याकडे मागण्या करतात, आंदोलन करतात. ही सरकारची जबाबदारी आहे की लोकांच्या मागण्या समजल्या पाहिजेत. जनेतेचे प्रश्न सकारात्मकतेने सोडवण्यासाठी सरकारकडे वेळच नाहीय. या घटना गंभीर असून प्रशासनाचा ढिसाळ कारभार आहे", असं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे लोकशाहीशी बोलताना म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com