Ashadhi Ekadashi 2025 : भाविकांच्या उत्साहात...,दिव्यांच्या झगमगाटात...उजळून निघाली पंढरी!
विठेवरती उभा कंबरेवरती हात असा हा सावळा पांडूरंग. पंढरीच्या वाटेवर चालणारे वारकरी आणि त्यांची वारी म्हणजे एक भक्तीमय सोहळा आहे.
अनेक वर्षापासून वारकरी टाळ, मृदुंगाच्या तालावर ज्ञानेश्वर आणि तुकोबाच्या नावाचा जयघोष करत वारी करत असतात.
कारण ओढ असते ते आपल्या विठ्ठल आणि रखुमाईला भेटीची, यामध्ये ते ऊन पावसाची पर्वा न करता अखंडपणे स्वतःला व जगाला विसरून चालत राहतात.
लाखो विठ्ठल भक्त पंढरपूरला भेट देतात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला 'दिंडी' या नावाने संबोधले जाते.
'वारी' करायची म्हणजे आपल्या घरून पायी चालत पांडुरंगाच्या भेटीला पंढरपूरला जायचे आणि भगवंताला भेटून घरी परत यायचे.
तुकोबा, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या काही दिवसच विठोबाच्या पंढरीमध्ये दाखल होणार असून त्याच आषाढी एकादशीसाठी पंढरपूर सजलं आहे.
विविध रंगाची उधळण, फुलाच्या माळ्यांनी मंदिरे सजले आहेत. आता फक्त वाट पाहत आहेत ती, म्हणजे आषाढी एकादशीची.