ताज्या बातम्या
Pandharpur : पंढरपुरात पूरसदृश्य परिस्थिती; पावसामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ
पंढरपूरमध्ये मुसळधार पाऊस पडत असून पंढरपुरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
अभिराज उबाळे, पंढरपूर
पंढरपूरमध्ये मुसळधार पाऊस पडत असून पंढरपुरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पंढरपुरातील भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस असून पावसामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पंढरपुरात भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.
उजनी धरणातून 70 हजार क्युसेकचा विसर्ग प्रवाहित होत आहे तर वीर धरणातून प्रवाहित झालेला 51 हजार क्युसेकचा विसर्ग पंढरपूरला येऊन पोहोचला असल्याची माहिती मिळत आहे. ब्रिटिशकालीन दगडी पूल महिन्याभरात तिसऱ्यांदा पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळत आहे.
भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली पाहायला मिळत असून त्यामुळे पंढरपुरात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.