धुळ्यात सततच्या पावसामुळे पांझरा नदीला महापुर; पाच पैकी चार पूल पाण्याखाली
धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून बरसणाऱ्या पावसामुळे अक्कलपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडल्याने पांजरा नदीला महापूर आला आहे. या पांजरा नदीवरील शहरातील पाच पैकी चार पूल पाण्याखाली गेल्याचं दिसून आला आहे. केवळ मोठ्या पुलावरच देवपूर भागातील नागरिकांची मदर असल्याने मोठ्या पुलावर वाहतुकीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. मोठ्या पुलावर वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता शहर वाहतूक शाखेच्या वतीने प्रयत्न केले जात आहे. नागरिकांनी मोठ्या पुलासह इतर पर्यायी मार्गाचा देखील वापर करण्याच आवाहन शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी केला आहे.
दरम्यान पांझरा नदीला पूर आल्याने नागरिकांनी पांझरा नदीकिनारी पूर पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देऊनही काही आततायी नागरिकांनी नदीकिनारीच पुलाच्या कठड्यावर बसून फोटो आणि रील्स काढण्यासाठी धडपड केल्याच दिसून आला आहे. मात्र अशा फोटो आणि रिल्स काढण्याच्या नादात त्यांच्या जीविताला धोका देखील निर्माण होऊ शकतो ही खबरदारी फोटो आणि रीलस काढणाऱ्यांनी बाळगणं गरजेचा आहे.
पांझरा नदीवरील, मोगलाई, गणपतीपुल, फरशी पूल, छोटा पूल हे चार पूल पाण्याखाली गेल्याने प्रशासनाने सकाळपासूनच या पुलावरील वाहतूक बंद केली होती. पांझरा नदीच्या पात्रात सातत्याने वाढ होत आहे. दुपारनंतर नदीपात्रात आणखी विसर्ग सोडणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मात्र नदीकिनारील नागरिकांनी सतर्कता बाळगून काळजी घ्यावी असा आव्हान देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आल आहे.