ठाकरे गटाची ऑफर स्वीकारणार का? पंकजा मुंडे म्हणाल्या...

ठाकरे गटाची ऑफर स्वीकारणार का? पंकजा मुंडे म्हणाल्या...

पंकजा मुंडे यांच्या भाजपावर नाराज असलेल्या चर्चा काही नवीन नाही.

पंकजा मुंडे यांच्या भाजपावर नाराज असलेल्या चर्चा काही नवीन नाही. याविषयावर राजकीय वर्तुळातून नेहमी काहीनाकाही प्रतिक्रिया येत असतात. याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझ्या मनात कोणतीही खदखद नाही. त्यामुळे माझ्या मनात खदखद आहे अशा बातम्या लावण्याचं कारण नाही. फडणवीस ज्या कार्यक्रमाला आले, त्या कार्यक्रमात मी अपेक्षित नव्हते. त्यामुळे मी आले नाही. आज प्रदेशाध्यक्ष आले म्हणून मी आले. जेपी नड्डा आले मी आले. असे त्या म्हणाल्या.

यासोबतच त्यांनी सांगितले की, मी भाजपच्या संस्कारात वाढलेली, मुशीत वाढलेली सच्ची कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी पक्षाचा प्रोटोकॉल पाळते. पण कुणाच्याही सार्वजनिक आणि पक्षाच्याबाहेरच्या कार्यक्रमाला जाणं मला कंपल्सरी नाही,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या कार्यक्रमात असतात त्या कार्यक्रमात पंकजा मुंडे दिसत नाहीत, असे विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले की, यावर वेगळी पत्रकार परिषद घेईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com