Parliament Special Session : संसद कर्मचाऱ्यांसाठी नवे गणवेश तयार

Parliament Special Session : संसद कर्मचाऱ्यांसाठी नवे गणवेश तयार

संसद कर्मचाऱ्यांसाठी नवे गणवेश तयार करण्यात आले आहेत.
Published by  :
Siddhi Naringrekar

संसद कर्मचाऱ्यांसाठी नवे गणवेश तयार करण्यात आले आहेत. नव्या संसदेत मार्शल आत सफारी सुटाऐवजी क्रीम रंगाचा कुर्ता आणि पायजम घालणार आहेत. तसेच अधिकाऱ्यांना क्रीम रंगाचा शर्ट असणार आहे तसेच गुलाबी कमळाचे प्रिंट असून कर्मचाऱ्यांच्या शर्टावर मेहरुन स्लीवलेस जॅकेट असणार आहे. तसेच खाकी रंगाची पॅन्ट असल्याची माहिती मिळत आहे. 19 तारखेपासून संसदेच्या दोन्ही सभागृहांची सत्र नव्या संसद इमारतीत होणार आहेत.

सभागृहात उपस्थित असणारे अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षारक्षक यांच्यासाठी वेगवेगळे ड्रेस कोड तयार करण्यात आले आहेत. 18 तारखेपासून संसदेचं विशेष अधिवेशन सुरू होणार आहे.नवीन ड्रेस कोड संसदेच्या दोन्ही सभागृहात लागू होणार आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) ने हा गणवेश तयार केला आहे. महिला कर्मचाऱ्यांना नवीन डिझाइनच्या साड्या मिळणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com