संसदेबाहेर कँडल स्मोक जाळणारा 'तो' तरूण महाराष्ट्रातील; कोण आहे?

संसदेबाहेर कँडल स्मोक जाळणारा 'तो' तरूण महाराष्ट्रातील; कोण आहे?

लोकसभेच्या आत दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारून खासदारांच्या बाकावर जाऊन कँडल स्मोक जाळून रंगीत गॅस पसरवला. दुसरीकडे संसदेबाहेर एका तरुण आणि महिलेने घोषणाबाजी केली.

नवी दिल्ली : संसद हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त आज संसदेच्या आत आणि बाहेर एकच खळबळ उडाली. एकीकडे लोकसभेच्या आत दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारून खासदारांच्या बाकावर जाऊन कँडल स्मोक जाळून रंगीत गॅस पसरवला. दुसरीकडे संसदेबाहेर एका तरुण आणि महिलेने कँडल स्मोक पसरवून घोषणाबाजी केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

संसदेबाहेर कँडल स्मोक जाळणारा 'तो' तरूण महाराष्ट्रातील; कोण आहे?
लोकसभेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर; प्रेक्षक गॅलरीतून 3जण संसदेत शिरले

संसदेबाहेर झालेल्या या घटनेप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. नीलम सिंग आणि अमोल शिंदे अशी या दोघांची नावे असल्याचे समजत आहे. नीलम ही महिला असून तिचे वय ४२ वर्षे आहे, ती हरियाणातील हिसार येथील रहिवासी आहे. अमोल शिंदे असे दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. अमोलच्या वडिलांचे नाव धनराज शिंदे असून ते महाराष्ट्रातील लातूरचे रहिवासी आहेत. त्याचे वय 25 वर्षे आहे. तर, लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून उडी मारलेल्या तरुणाचे नाव सागर असल्याचे सांगण्यात येत आहे.

संसद भवनाबाहेर आणि परिवहन भवनासमोर ही घटना घडली. संसदेबाहेर आंदोलन करणाऱ्या नीलन आणि अनमोलने भारत माता की जय, जय भीम, हुकूमशाही चालणार नाही, अशा घोषणा दिल्या. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. या दोघांनाही पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात आणण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. दिल्ली पोलिसांसह इंटेलिजन्स ब्युरोची टीमही चौकशी करत आहे.

दरम्यान, 22 वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजेच 13 डिसेंबर 2001 रोजी संसद भवनावर दहशतवादी हल्ला झाला होता. सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, यावेळी संसदेत मोठे नेते उपस्थित होते. या दृष्टीकोनातून पाहिल्यास संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com