Vande Bharat Train : ‘वंदे भारत रेल्वे’त प्रवाशांना स्थानिक खाद्यपदार्थ मिळणार; रेल्वे मंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश…

Vande Bharat Train : ‘वंदे भारत रेल्वे’त प्रवाशांना स्थानिक खाद्यपदार्थ मिळणार; रेल्वे मंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश…

स्थानिक खाद्यपदार्थ आता वंदे भारत रेल्वेमध्ये (Vande Bharat Train) प्रवाशांना मिळणार आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव पुढील काळात वंदे भारत रेल्वेमधील प्रवाशांना स्थानिक पदार्थ उपलब्ध करुन द्यावेत, असे निर्देश केंद्रीय यांनी दिले आहेत.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

स्थानिक खाद्यपदार्थ आता वंदे भारत रेल्वेमध्ये (Vande Bharat Train) प्रवाशांना मिळणार आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव पुढील काळात वंदे भारत रेल्वेमधील प्रवाशांना स्थानिक पदार्थ उपलब्ध करुन द्यावेत, असे निर्देश केंद्रीय यांनी दिले आहेत. दरम्यान, रेल्वे भवनमध्ये शनिवारी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत वैष्णव यांची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले आहेत. या बैठकीला रेल्वे आणि प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू उपस्थित होते.

वंदे भारत रेल्वेमध्ये स्थानिक खाद्यपदार्थ, जेवणाची सुरुवात झाल्यानंतर पुढील काळात हळूहळू सर्वच गाड्यांमध्ये स्थानिक जेवणाची सुविधा लागू केली जाणार आहे. उत्तरेकडील वंदे भारत रेल्वेमध्ये सध्या प्रवाशांना समान जेवण दिलं जात आहे. तर दक्षिणेकडील रेल्वेमध्ये इडली, वडा, सांबर, उपमा, मेदूवडा, पोंगल असं स्थानिक जेवण दिले जात आहे. प्रवाशांना स्थानिक जेवणाची ओळख करुन दिल्याने प्रवाशांचा अनुभव वाढणार असून प्रत्येक प्रदेशाच्या संस्कृतीची चव त्यांना घेता येणार आहे.

काही दिवसांपासून बनावट ओळखपत्रांचा वापर करून रेल्वे तिकीट बुकिंग करणाऱ्यांवर भारतीय रेल्वेने केलेल्या कारवाईचे प्रभावी परिणाम दिसून येत आहेत, असेही केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले. वापरकर्ता ओळखपत्रे स्थापित करण्यासाठी आणि बनावट आयडी शोधण्यासाठी कठोर प्रणाली लागू केल्यानंतर, आयआरसीटीसी वेबसाइटवर दररोज अंदाजे ५ हजार नवीन वापरकर्ता आयडी तयार केले जात आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तिकीट प्रणाली इतकी सुधारित करण्याचे निर्देश दिले की सर्व प्रवासी खऱ्या आणि प्रामाणिक वापरकर्ता आयडीचा वापर करून सहजपणे तिकिटे बुक करू शकतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com