पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) हा एक हार्मोनल विकार असून जो प्रजनन स्थितीमध्ये स्त्रियांच्या शरीरात होतो. यामध्ये मासिक पाळी अनियमित होते किंवा पूर्णपणे थांबते. PCOS चे नेमके कारण अजूनही पूर्णपणे समजलेले नसले तरी काही घटक PCOS होण्यास कारणीभूत असू शकतात. शरीरातील हार्मोनच्या पातळीत बदल झाल्यामुळे PCOS हा मुखत्वे होऊ शकतो.
पीसीओएस असताना वजन कमी करणे अनेकदा कठीण असते. यासाठी PCOS असलेल्या व्यक्तींसाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे महत्त्वाचे आहे. आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये आणि पातळ प्रथिने (मांस, मासे, चिकन) यांचा समावेश असावा.त्याचप्रमाणे नियमित व्यायाम केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. आणि इन्सुलिनची पातळी नियंत्रित राहते. PCOS ची लक्षणे कमी करण्यासाठी वजन कमी करणे आवश्यक आहे. PCOS मुळे तणाव वाढू शकतो, त्यामुळे तणाव व्यवस्थापनासाठी योग, ध्यान किंवा इतर विश्रांती घेणे महत्वाचे आहे. पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS)नियंत्रित करण्यासाठी, जीवनशैलीत बदल करणे, जसे की संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करणे, तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे आवश्यक आहे. PCOS नियंत्रित करण्यासाठी खालील सुपरफूड महत्वाचे ठरतात :-
बिल्व
आपल्या शरीरातील पचनाची क्रिया सुधारण्याबरोबरच आपल्या शरीरातील ग्लुकोज पातळी नियंत्रित करून वजन कमी करण्यास मदत करतात.
आपल्या शरीरातील इन्सुलिन प्रतिरोध कमी करून वजन कमी करण्यास मदत करतात. आपल्या रोजच्या जेवणात याचा समावेश करता येऊ शकतो.
जांभूळ झाल्यानंतर पोट जास्त प्रमाणात भरल्यासारखे वाटते, त्यामुळे वजन नियंत्रित करण्यात याचा मोठा समावेश असू शकतो.
पचनासाठी अतिशय गुणकारी आणि ऊर्जेचे स्रोत म्हणून हरभरा अत्यंत गुणकारी आहे. हे रक्तातील साखरेची पातळीही कमी करते. आणि वजन नियंत्रित करते.
इन्सुलिन नियंत्रित करून वजन कमी करण्यास मदत करते. रक्तातील साखरेची पातळीही यामुळे नियंत्रित राहते.
1) कार्बोहायड्रेटच्या सेवनाकडे लक्ष द्या
2)लोहाचे प्रमाण जास्त ठेवणे
3)मॅग्नेशियमचे सेवन वाढवणे
4)फायबरचे सेवन वाढवणे
5)कॉफी टाळणे
6)जंक आणि तेलकट/चरबीयुक्त पदार्थ टाळणे
7)सोया उत्पादने वापरणे