Karuna Munde : डॉ. संपदा मुंडे प्रकरणात नवा खुलासा; करुणा मुंडेंच्या 'या' वक्तव्याने उचवल्या सगळ्यांच्या भुवया

Karuna Munde : डॉ. संपदा मुंडे प्रकरणात नवा खुलासा; करुणा मुंडेंच्या 'या' वक्तव्याने उचवल्या सगळ्यांच्या भुवया

फलटण येथील डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा शर्मा-मुंडे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.
Published on

थोडक्यात

  • फलटण येथील डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत.

  • स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा शर्मा-मुंडे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळावा.

  • अशी मागणी करुणा शर्मा-मुंडे यांनी केली आहे.

Karuna Munde On Satara Female Doctor case : फलटण येथील डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा शर्मा-मुंडे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.

करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या घटनेत डीवायएसपी आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन यांनाही सहआरोपी म्हणून तपासात सामील करावे. तसेच पोस्टमॉर्टम अहवालात बदल कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आले, याचीही चौकशी व्हावी. त्यांचा ठाम दावा आहे की संपदा मुंडे यांचा मृत्यू आत्महत्या नसून हत्या असू शकते.

त्यांनी निंबाळकर यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत “या प्रकरणामागील खरा सूत्रधार फलटणचा आका शोधला पाहिजे, तेव्हाच संपदाताईला न्याय मिळेल,” असे वक्तव्य केले. करुणा मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या आमदारांना या प्रकरणात पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत, तोपर्यंत स्वराज्य शक्ती सेना शांत बसणार नाही, असा इशाराही दिला. या प्रकरणावरील पुढील माहिती 7 नोव्हेंबरला छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत दिली जाणार असल्याचे करुणा मुंडेंनी स्पष्ट केले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com