Devendra Fadnavis : फलटण महिला डॉक्टर प्रकरणी फडणवीसांनी दिली सभागृहात धक्कादायक माहिती
Devendra Fadnavis : फलटण महिला डॉक्टर प्रकरणी फडणवीसांनी दिली सभागृहात धक्कादायक माहितीDevendra Fadnavis : फलटण महिला डॉक्टर प्रकरणी फडणवीसांनी दिली सभागृहात धक्कादायक माहिती

Devendra Fadnavis : फलटण महिला डॉक्टर प्रकरणी फडणवीसांनी दिली सभागृहात धक्कादायक माहिती

फलटण येथील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणी आज विधासनभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिलं.
Published by :
Riddhi Vanne
Published on

(Devendra Fadnavis) फलटण येथील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणी आज विधासनभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिलं. “महिला डॉक्टरने आत्महत्या केली आणि त्या घटनेमुळे समाजात तीव्र दुःखाची लाट पसरली. आम्ही एसआयटी (विशेष तपास पथक) नेमलं आहे आणि न्यायिक समितीच्या माध्यमातून चौकशी सुरु आहे. सन्माननीय सदस्यांनी तीन महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. आतापर्यंतच्या तपासानुसार फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाला आहे. त्या अहवालानुसार, डॉक्टर महिलेने तिच्या हातावर जो काही लिहिलं आहे, ती हँडरायटिंग तिचीच आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिली.

“दुसरा मुद्दा असं मांडला गेला की, या प्रकरणात आरोपींनी दबाव आणला का? यामध्ये जो पोलीस अधिकारी बदनामीला सामोरे जात आहेत, त्यांच्या कडून माहिती लीक होणं, चॅट्स मिळणं आणि त्यातून शारीरिक शोषण करणं हे तपासात उघड झालं आहे,” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

“तपासातून असं निष्पन्न झालं आहे की, बदनामी करणाऱ्या आरोपीने डॉक्टरला फसवून तिचं शोषण केलं. त्याने तिला लग्नाचं आश्वासन दिलं, मात्र नंतर त्याने दुसरी भूमिका घेतली आणि तिचं शारीरिक शोषण केलं,” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. “ती डॉक्टर मेडीकल ऑफिसर होती आणि ज्याला अटक करण्यात आली आहे, त्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अटक करण्यासाठी योग्य आहे का, यावर एक अहवाल आवश्यक आहे,” असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.

“त्या महिला डॉक्टरने काही महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये आरोपींना अनफिट ठरवण्याचे प्रमाणपत्र दिलं होतं, ज्यावर पोलिसांनी त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं होतं. या सर्व घडामोडी पाच महिन्यांपूर्वी घडलेल्या आहेत,” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

महिला डॉक्टरच्या हातावर लिहिलेलं अक्षर तिचंच आहे

“महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणात, बदनामी करणाऱ्याने तिच्या स्थितीचा गैरफायदा घेतला. त्या परिस्थितीचा उपयोग करून दुसऱ्या आरोपीने तिच्या बाबतीत फसवणूक केली. ती दोन्ही आरोपींची नावे हातावर लिहून गेली. आतापर्यंतच्या तपासानुसार, डॉक्टरचा मृत्यू गळफासाने झाला आहे. आणि फॉरेन्सिक अहवालानुसार, हातावर असलेलं अक्षर तिचंच आहे. तपास अजूनही सुरू आहे, आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. अनेक बाबी समोर आल्या आहेत, ज्याची स्वतंत्र चौकशी न्यायालयाने केली आहे. महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास सुरू आहे,” असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केलं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com