Pimpri-Chinchwad: पिझ्झा खात असाल तर सावधान! पिझ्झामध्ये आढळला चाकूचा तुटलेला तुकडा

Pimpri-Chinchwad: पिझ्झा खात असाल तर सावधान! पिझ्झामध्ये आढळला चाकूचा तुटलेला तुकडा

पिंपरी-चिंचवडमध्ये पिझ्झा खाताना चाकूचा तुटलेला तुकडा सापडला. नागरिकांनी सावध राहावे, कारण आरोग्याशी संबंधित हा प्रकार अतिशय धक्कादायक आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

तुम्ही सुद्धा पिझ्झा खात असाल तर आता लगेच सावध व्हा, कारण पिझ्झामध्ये अक्षरशः चाकूचां तुटलेला तुकडा आढळून आला आहे. पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरातील इंद्रायणी नगरमध्ये डॉमिनोज पिझ्झात चाकूचां तुटलेला तुकडा आढळून आला आहे. इंद्रायणी नगर मध्ये राहणाऱ्या अरुण कापसे या व्यक्तीने आपल्या कुटुंबीयांसाठी काल रात्री 596 रुपयांचा पिझ्झाची ऑनलाइन ऑर्डर केली होती.

पिझ्झा आल्यानंतर आपल्या कुटुंबीयांसोबत पिझ्झाचा आस्वाद घेत असताना, अरुण कापसे यांच्या दातात अचानक पिझ्झा कट करणाऱ्या चाकूच तुटलेला तुकडा घुसला होता. त्यांनी हा सर्व प्रकारडोमिनोज पिझ्झाच्या मॅनेजरला फोन करून सांगितला, आणि त्यानंतर पिझ्झाच्या मॅनेजररडून उलट सुलट उत्तर आल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र घडलेल्या सर्व प्रकारानंतर डॉमिनोज पिझ्झाकडून अरुण कापसे यांना त्यांच्या पिझ्झाच्या ऑर्डर चे पैसे लगेच परत करण्यात आले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी, खेळ खेळणाऱ्या डॉमिनोज पिझ्झा विरोधात अरुण कापसे हे आज पुणे जिल्हा अन्न व औषध विभाग प्रशासनाकडे तक्रार करणार आहेत. अरुण कापसे यांच्यासोबत घडलेला हा प्रकार अतिशय धक्कादायक असल्याने त्यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com