PM Kisan Yojana
PM Kisan YojanaPM Kisan Yojana

PM Kisan Yojana: पीएम किसानची मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मोठा फटका, कारण जाणून घ्या...

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM Kisan Yojana) अंतर्गत 19 नोव्हेंबर रोजी 21 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होती.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM Kisan Yojana) अंतर्गत 19 नोव्हेंबर रोजी 21 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होती. मात्र, काही शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही. योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांनी आपली माहिती अपडेट केली नसल्यास, त्यांना हा हप्ता मिळणार नाही.

काय आहेत कारणे?

1.eKYC न केल्यास: जर शेतकऱ्यांनी eKYC प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर त्यांना रक्कम मिळणार नाही.

2. भू-सत्यापनाची प्रक्रिया न पूर्ण केली: ज्यांनी भू-सत्यापन प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांना देखील हप्ता मिळणार नाही.

3. चुकलेली माहिती: जर बँक खात्याची माहिती, IFSC कोड, आधार क्रमांक, किंवा शेतकऱ्याच्या नावात गडबड केली असेल, तर त्यांनाही 21 वा हप्ता मिळणार नाही.

कस तपासाल स्टेटस?

शेतकऱ्यांना आपला PM Kisan Yojana चा स्टेटस तपासण्यासाठी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन "Know Your Status" पर्यायावर क्लिक करावा लागेल. त्यानंतर आधार क्रमांक आणि बँक खात्याची माहिती भरून पेमेंट स्टेटस तपासू शकता. शेतकऱ्यांसाठी सूचना: जर तुम्ही वरील प्रक्रियांचा पूर्ण केलेला नसाल, तर लवकरात लवकर आवश्यक दुरुस्त्या करा, कारण 19 नोव्हेंबरपासून हप्ता जमा होणार आहे.

थोडक्यात

  • (PM Kisan Yojana) अंतर्गत 19 नोव्हेंबर रोजी 21 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होती..

  • मात्र, काही शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही. योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांनी आपली माहिती अपडेट केली.

  • शेतकऱ्यांना आपला PM Kisan Yojana चा स्टेटस तपासण्यासाठी pmkisan.gov.in

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com