जवान हेच माझे कुटुंब, दिवाळी म्हणजे दहशतवादाचा अंत : पंतप्रधान मोदी

जवान हेच माझे कुटुंब, दिवाळी म्हणजे दहशतवादाचा अंत : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी जम्मू-काश्मीरमधील कारगिलमध्ये पोहोचले आहेत. ते येथे लष्करातील जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी जम्मू-काश्मीरमधील कारगिलमध्ये पोहोचले आहेत. ते येथे लष्करातील जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. यावेळी पीएम मोदींनी पुन्हा एकदा जोर दिला आहे की, भारतीय जवान हेच माझ कुटुंब आहे. त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करायला आवडते, असे म्हंटले आहे.

जवान हेच माझे कुटुंब, दिवाळी म्हणजे दहशतवादाचा अंत : पंतप्रधान मोदी
'टीम इंडियाने मॅच जिंकली, तशीच आम्ही तीन महिन्यांपूर्वी मोठी मॅच जिंकलीयं'

मोदी म्हणाले की, दिवाळी म्हणजे दहशतवाद संपवणारा उत्सव. कारगिल युद्धाच्या वेळीही लष्कराने अशाच प्रकारे दहशतवादाचा धुव्वा उडवला होता. व दैवी विजय मिळवला होता. कोणतेही राष्ट्र स्वतःला तेव्हाच सुरक्षित म्हणू शकते जेव्हा त्याच्या सीमा सुरक्षित असतील, जेव्हा त्याची अर्थव्यवस्था मजबूत असेल आणि गरीबांना स्वतःचे घर मिळेल, प्रत्येक सुविधा उपलब्ध असेल, असेही त्यांनी म्हंटले आहे.

अलीकडेच इस्रोने ब्रॉडबँडचा विस्तार केला आणि एकाच वेळी 36 उपग्रह अवकाशात सोडल्याचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. गेल्या आठ वर्षांत देशाची अर्थव्यवस्थाही दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आली आहे. या यशांमुळे प्रत्येकाला अभिमानाची संधी मिळत आहे. लष्कराचे जवानही आनंदी आहेत. गेल्या काही वर्षांत लष्करात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. चांगल्या समन्वयासाठी सीडीएस बनवणे असो किंवा सीमेवर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणे असो.

जवान हेच माझे कुटुंब, दिवाळी म्हणजे दहशतवादाचा अंत : पंतप्रधान मोदी
दोन वर्षे डिलीट करता आली असती तर केली असती; शेलारांचा उध्दव ठाकरेंवर निशाणा

विरोधकांना आव्हान देत मोदी म्हणाले की, आमच्याकडे कोणी पाहिलं तर आमच्या तिन्ही सेना त्याच भाषेत चोख प्रत्युत्तर देतील. त्यांचा पराभव होईल. यावेळी पंतप्रधानांनी स्वावलंबनाचा मंत्रही दिला. देशाच्या जवानाने स्वदेशी शस्त्रांचा वापर केल्यास शत्रूचा पराभव निश्चित होतो, व मनोधैर्यही दहा पटीने वाढते, असेही ते म्हणाले.

पंतप्रधानांनी आपल्या भाषणाच्या शेवटी एक दमदार कविताही ऐकवली, त्या कवितेतून त्यांनी सैनिकांना प्रोत्साहन देण्याचे काम केले. त्या कवितेतील ब्रह्मोसच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली आणि तेजसच्या उड्डाणाचाही उल्लेख केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com