PM Narendra Modi
PM Narendra ModiTeam Lokshahi

PM Modi contender for Nobel Peace Prize : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळू शकतो?

जगातील सर्वात मोठ्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

जगातील सर्वात मोठ्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. जगाला शांतता आणि प्रगतीचा मार्ग दाखवून भारताचे नेतृत्व करणारे पंतप्रधान मोदी केवळ आपल्या देशाचा ध्वज जगभरात फडकवत नाहीत. तर त्याच्या गुणवत्तेची प्रशंसा करणाऱ्यांमध्ये नोबेल पारितोषिक समितीच्या सदस्याचेही नाव समाविष्ट करण्यात आले आहे.

नोबेल पारितोषिक समितीची टीम नॉर्वेहून भारतात आली आहे. हीच समिती शांतता पुरस्कार विजेत्याचा निर्णय घेते आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या समितीच्या उपनेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींसारख्या शक्तिशाली नेत्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्याची प्रचंड क्षमता आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे.

नोबेल शांतता पुरस्कार विजेत्याची घोषणा करण्यासाठी भारतात आलेल्या नॉर्वेच्या नोबेल पारितोषिक समितीचे उपनेते अस्ले तोजे यांनी एका माध्यमाला सांगितले की, “आम्हाला नोबेल शांतता पुरस्कारासाठी मोठ्या प्रमाणात भारतीय नामांकन मिळत आहेत. मला आशा आहे की जगातील प्रत्येक नेता नोबेल शांतता पुरस्कारासाठी आवश्यक असलेले काम करेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत ते म्हणाले, मोदींसारख्या ताकदवान नेत्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्याची जबरदस्त क्षमता आहे. पीएम मोदी हे अतिशय शक्तिशाली देशातून आले आहेत, त्यांना खूप गांभीर्याने घेतले जाते. त्याच्यामध्ये अफाट विश्वासार्हता आहे. पंतप्रधान मोदी रशिया, अमेरिका आणि चीनच्या प्रमुखांशी युद्धाबाबत बोलले आहेत. त्यांनी आगामी भविष्य युद्धाचे नाही तर शांततेचे असावे, असे सांगितेल आहे. मला आनंद आहे की मोदी केवळ भारताला पुढे नेण्याचे काम करत नाहीत तर जगातील शांततेसाठी काम करत आहेत. असे ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com