Nepal Violence : नेपाळच्या राजकीय उलथापालथीनंतर पंतप्रधान मोदींची पाहिली प्रतिक्रिया
Nepal Violence : नेपाळच्या राजकीय उलथापालथीनंतर पंतप्रधान मोदींची पाहिली प्रतिक्रिया Nepal Violence : नेपाळच्या राजकीय उलथापालथीनंतर पंतप्रधान मोदींची पाहिली प्रतिक्रिया

Nepal Violence : नेपाळच्या राजकीय उलथापालथीनंतर पंतप्रधान मोदींची पाहिली प्रतिक्रिया म्हणाले की,...

नेपाळच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदींची एक्सवर पोस्ट टाकत दिली प्रतिक्रिया
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

नेपाळच्या काल आंदोलनाने हिंसक वळण घेतलं

सोशलमीडियाच्या बंदीमुळे आंदोलन अधिकच चिघळलं

पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि राष्ट्रपतींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या अधिकृत एक्सवर पोस्ट टाकत आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

Narendra Modi X post On Nepal Violence : नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन हिंसक वळण घेत आहे. सोशल मीडियावर घातलेल्या बंदीविरोधात सुरू झालेल्या या चळवळीने काही दिवसांतच व्यापक रूप धारण केलं. सरकारमधील भ्रष्टाचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घालण्यात आलेल्या मर्यादांमुळे तरुणांच्या आक्रमक आंदोलनाने संसद, सर्वोच्च न्यायालय आणि शासकीय निवासस्थाने जाळपोळीतून उद्ध्वस्त केली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि राष्ट्रपतींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गंभीर परिस्थितीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून मोदींनी म्हटलं की, “नेपाळमधील हिंसाचार हृदयद्रावक असून यात अनेक तरुणांचे प्राण गेले, हे अत्यंत दु:खद आहे. नेपाळमध्ये स्थैर्य, शांतता आणि समृद्धी प्रस्थापित होणे भारतासाठी महत्त्वाचे आहे. सर्व नागरिकांनी शांततेचा मार्ग स्वीकारून कायद्याचं पालन करावं.”

दरम्यान, आंदोलकांनी केवळ सरकारी कार्यालयेच नव्हे तर माजी पंतप्रधानांच्या कुटुंबीयांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अनेक महत्त्वाच्या इमारती जाळून टाकल्या गेल्या असून राजधानी काठमांडूमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. व्यापक हिंसाचारामुळे सुरक्षा यंत्रणांवर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आता नेपाळमध्ये नव्या सरकार स्थापनेबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. आंदोलकांचा मोठा गट काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह यांना पंतप्रधानपदाची सूत्रे द्यावीत, अशी मागणी करत आहे. पुढील काही दिवसांत नेपाळचं राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com