Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

"छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान करेल, त्याला गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही"; नाशिकमध्ये उद्धव ठाकरे कडाडले

छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान करेल, त्याला आम्ही गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला आहे.
Published by :

Uddhav Thackeray On Narendra Modi : शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, असा आदेश देणारे महाराज कुठे आणि नाशिकमध्ये येऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत ठेवणारं सरकार कुठे? कांदा उत्पादक शेतकऱ्यांना माझ्या सभेत येण्यासाठी पोलिसांनी का आडवलं नाही? कारण ही माझी माणसं आहेत. मी माझ्यासाठी नाही, तर कांदा उत्पादकांसाठी लढाई लढत आहे. तुमच्या सर्वांसाठी मी लढाई लढतो आहे. तुमच्या विश्वासामुळेच मी हुकूमशाहासमोर उभा राहिलो आहे. मी त्यांना आव्हान देतोय की, आज त्यांना मुंबईच्या रस्त्यावर आणलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान करेल, त्याला आम्ही गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे. ठाकरे नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत बोलत होते.

ठाकरे विरोधकांवर टीका करत म्हणाले, आम्ही महाराजांची शपथ घेऊन मैदानात उतरलो आहे. यांच्या मनात आकस किती आहे. कांदा निर्यात बंदी उठवली तर कर लावतात, पण स्वत:च्या गुजरातमध्ये निर्यातबंदी उठवून तुम्ही त्यांना परवानगी देता. तुम्ही हा भेदभाव का करत आहेत? जर तुम्ही गुजरात आणि महाराष्ट्रात असा भेदभाव करत असाल, तर तुम्हाला गुजरातमध्ये परत पाठवून द्यायला हा महाराष्ट्र पुरेसा आहे. माझ्या शेतकऱ्यांना मी वचन देतो. गद्दाराला ५० खोके देता आणि कांद्याला भाव देत नाहीत.

नाशिकमधल्या एका कांद्याला पन्नास खोके दिलेत. पण तुम्ही शेतकरी बनून तुमची ताकद दाखवली पाहिजे. इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर तुमच्या हिताचं निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. मोदी शहंशाहसारखे फिरतात आणि आमच्यावर टीका करतात. मोदी फक्त घराणेशाहीवरच टीका करतात. मोदी तुम्ही गेल्या सात पिढ्यांची तुमची वंशावळ घेऊन या. मी माझी घेऊन येतो, असं थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी मोदींना दिलं आहे.

मणिपूरमध्ये महिलांची धिंड कशी निघाली, तुम्हाला माहितीय. तिकडे जायची यांची हिंमत नाही. ना मोदींची हिंमत आहे, नात त्या अमित शहांची. महिलांवर कुणी अत्याचार केला, तर छत्रपती शिवाजी महाराज त्याचा शिरच्छेद करायचे. मोदी तुमची महाराजांचं दर्शन घेण्याचीही पात्रता नाही. कर्नाटकात प्रज्वल रेवन्ना महिलांवर अत्याचार करणारा माणूस आणि मोदी निर्लज्जपणाने सांगातात या रेवन्नांना मत म्हणजे मोदींना मत. माझ्या महाराजांची बरोबरी हे करु शकतात का? हा माझ्या महाराष्ट्राचा अपमान आहे. प्रफुल्ल पटेलांना सुद्धा कळलंय, ज्यांच्या डोक्यात महाराजांचा जिरेटोप घातला, ते डोकं त्या लायकीचं नाहीय, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com