Narendra Modi
Narendra Modi

"मोदी आहेत, घरात घुसून मारतात...", सर्जिकल स्ट्राईकचा दाखला देत PM मोदींनी विरोधकांवर डागली तोफ

परभणीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली.
Published by :

मागील निवडणुकीत आपण चांद्रयानचं यशस्वी प्रक्षेपण पाहिलं आहे. या निवडणुकीनंतर १४० कोटी देशवासी गगनयानचं यश पाहतील. सैनिकांच्या सामग्रीपासून कोरोनाच्या लशींपर्यंत लोक आत्मनिर्भर भारताच्या यशाची प्रत्येक कानाकोपऱ्यात चर्चा करत आहेत. २०१४ मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा लोकसभा निवणडूक लढवत होतो, तेव्हा निवडणुकीत काय चर्चा होत होती, माध्यमांमध्ये काय बातम्या येत होत्या, दहशतवादी हल्ल्यांची भीती, बॉम्बस्फोट होण्याची भीती, हेच समोर येत होतं. पाच वर्षानंतर २०१९ मध्ये दहशतवादी हल्ले बंद झाले. मोदी आहेत, घरात घुसून मारतात. सर्जिकल स्ट्राईकची चर्चा होत होती. सर्जिकली स्ट्राईकची चर्चा ऐकून महाराष्ट्रलाही गर्व झाला, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते परभणीच्या महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते.

मोदी जनतेला संबोधीत करताना पुढे म्हणाले, २०२४ ची निवडणूक फक्त सरकार बनवण्यासाठी होत नाही. भारताला विकसीत करणं, हेच या निवडणुकीचं धेय्य आहे. भारताला आत्मनिर्भर करायचं आहे. २०२४ च्या निवडणुकीचे मुद्दे सामान्य नाहीत. प्रत्येक मुद्दा महत्वाचा आहे. प्रत्येक संकल्प महत्त्वाचा आहे. ही पहिली निवडणूक आहे, ज्यामुळे भारताला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवणं शक्य होणार आहे.

एनडीए सरकार सबका साथ सबका विकासच्या मंत्रावर काम करतं. कोणतीही जात धर्म असो, आमचं सरकार प्रत्येकासाठी काम करतं. परभणीत भेदभाव न करता जवळपास ४० हजार गरिबांना पक्के घर मिळाले. ज्यांना घर मिळाले आहेत, यामध्ये ओबीसी, दलित, आदिवासी समाजातील लोक आहेत. हेच लोक वंचित राहिले होते. कुणाला घर मिळालं नसेल, पाण्याचं कनेक्शन मिळालं नसेल, माझ्यावतीनं त्यांना सांगा, मोदींची गॅरंटी आहे. तिसऱ्या टर्ममध्ये तुमचंही काम होईल. परभणीच्या १२ लाखांहून जास्त गरिबांना भेदभाव न करता मोफत रेशन मिळत आहे. मुलं उपाशी राहू नयेत. आईच्या डोळ्यांत अश्रू येऊ नये, यासाठी मोदी मोफत रेशन देत आहे. ७५ टक्क्यांहून अधिक घरातं नळाचं पाणी येत आहे.

काँगेस आणि इंडिया आघाडीनं तुमच्या समस्या समजून घेतल्या नाही. सिंचनाची मोठी समस्या इथे आहे. एनडीएच्या मागील सरकारने जलयुक्त शिवार योजना सुरु केली होती. पण इथे इंडिया आघाडीने तुमच्याशी दुश्मनी घेऊन दोन्ही योजना बंद केल्या. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची टीम या ठिकाणी सिंचनाच्या समस्या सोडवत आहेत. पालघरच्या साधूंच्या हत्याचे मजाक करणाऱ्यांना महाराष्ट्रात स्थान मिळालं पाहिजे का, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रांना भारताच्या विकासाबाबत चीड आहे. काँग्रेसचं सरकार स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशांचे चिन्ह शोधत होते.

आपल्या नौदलाच्या झेंड्यावर आतापर्यंत ब्रिटाशांचं प्रतिकचिन्ह होतं. आम्ही ते हटवलं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा लावली आणि नौदलाला नवीन ओळख दिली. काही महिन्यांपूर्वी नौसेना दिवसाची परंपरा बदलली. याआधी नौसेना दिवस दिल्लीत साजरा केला जायचा. पण आम्ही सिंधुदुर्गच्या किल्ल्यावर भव्य आयोजन करून श्रद्धांजली वाहिली आणि त्यांचे विचार पुढे जाण्यासाठी निश्चय केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com