Rahul Gandhi On Narendra Modi
Rahul Gandhi On Narendra Modi

'EVM'शिवाय नरेंद्र मोदी निवडणूक जिंकू शकत नाही, राहुल गांधी यांनी महायुती सरकारवर डागली तोफ

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात इंडिया आघाडीनं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी राहुल गांधींसह सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मोदी सरकारवर टीका केली.
Published by :

राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरु झालेली भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप सोहळा दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात पार पाडला. इंडिया आघाडीनं जोरदार शक्तिप्रदर्शन करत महायुती सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. इव्हीएमशिवाय नरेंद्र मोदी निवडणूक जिंकणार नाही. ही मशीन कशी चालते, हे निवडणूक आयोग विरोधकांना दाखवत नाहीत. मत मशिनमध्ये नाही, मत कागदात आहे. निवडणूक आयोग म्हणतं, कागदाची मोजणी होणार नाही. सिस्टमला हे नको हवंय. ईव्हीएमच्या मतांसह चिठ्ठ्यांचीही मोजणी करा, असं थेट आवाहन राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला केलं आहे.

इंडिया आघाडीच्या जाहीर सभेत राहुल गांधी पुढे म्हणाले, मागील वर्षी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत आम्ही यात्रा केली. यात्रा करावी लागली. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत मला ४ हजार किमी चालावे लागेल, असं मला कधीच वाटलं नव्हतं. देशाचं कम्युनिकेशन सिस्टम, मीडिया, सोशल मीडिया, आज देशाच्या हातात नाहीय, म्हणून यात्रा करावी लागली, बेरोजगारी, महागाई, अग्नीवीर, शेतकऱ्यांचे मुद्दे, तुम्हाला मीडियात दिसणार नाही. म्हणून आम्हाला ही यात्रा करावी लागली. राहुल गांधींसोबत देशातील संपूर्ण विरोधी पक्ष यात्रेत सहभागी झाले.

शरद पवार, उद्धव ठाकरे यांनीही या यात्रेत सहभाग घेतला. आपल्यावर अमेरिकेच्या कंपनीचा दबाव आहे. भाजप विरोधात आम्ही लढत असल्यानं खूप चर्चा होतात. आम्ही एका राजकीय पक्षाच्या विरोधात लढत आहोत, असं जनता आणि देशाला वाटतंय. हे खरं नाही. आम्ही राजकीय पक्षाच्या विरोधात लढत नाही. भारताच्या तरुणांना ही गोष्ट समजून घ्यावी लागेल. हे सर्व लोक नरेंद्र मोदी विरोधात लढत आहेत. आम्ही एका व्यक्ती विरोधात आणि भाजपविरोधात लढत नाही.

आम्ही एका शक्तीविरोधात लढत आहोत. मग ती शक्ती कोणती, राजाची आत्मा ईव्हीएममध्ये आहे, असं कुणीतरी म्हणतं, हे खरं आहे. राजाची आत्मा ईव्हीएममध्ये आहे. या प्रदेशातील वरिष्ठ नेता काँग्रेसला सोडतात आणि माझ्या आईला रडून सांगतात, मला या शक्तीविरोधात या लोकांविरोधात लढण्याची ताकद नाहीय, मला तुरुंगात जायचं नाहीय, असं म्हणत नाव न घेता राहुल गांधी यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. ते पुढे म्हणाले, भाजप एक नाही तर हजारो लोकांना भीती दाखवत आहेत. लोकांनी घाबरून भाजपात प्रवेश केला. मणीपूर ते महाराष्ट्र, मुंबई धारावी सहा हजार किमी चाललो, मी काय पाहिलं तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. नरेंद्र मोदी फक्त मास्क आहे, मुखवटा आहे, बॉलिवडूच्या कलाकारांना रोल दिलं आहे. त्याप्रमाणे ते वागतात. छप्पल इंचची छाती नाही, ही व्यक्ती पोकळ आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला.

एकत्र मिळून तीच शक्ती या लोकांचं आयुष्य उद्धस्त करत आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु करण्यासाठी अनेक वर्षे लागतात. पण लग्नासाठी दहा दिवसात सुरु होतं. भारताला व्हिजन देण्यासाठी धारावीत यात्रा. धारवी चीनच्या शेंनजेन शहराला टक्कर देईल. देशाच्या २२ टक्के लोकांकडे देशाची संपूर्ण संपत्ती, मी सिस्टम समजतो म्हणून मोदीजी मला घाबरतात. ९० अधिकारीहा देश चालवतात, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com