Eknath Shinde
Eknath Shinde

"...अन् पंतप्रधान मोदींनी युक्रेन-रशियाचं युद्ध थांबवलं"; CM एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

"हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं हे सरकार आहे. लोकसभा निवडणुकीत काही लोकांनी फेक नरेटिव्ह सेट केले. खोट्या नरेटिव्हच्या माध्यमातून चुकीचे गैरसमज पसरवले"
Published by :
Naresh Shende
Published on

Eknath Shinde On PM Narendra Modi : युक्रेन-रशियात युद्ध सुरु होतं. आपल्या देशातील विद्यार्थी तिथे अडकले होते. ते सर्व जातीपातीचे लोक आहेत. पालकांना विद्यार्थ्यांची चिंता लागली होती. पण युद्ध थांबवण्याची हिंम्मत एकाच व्यक्तीमध्ये होती. त्यांचं नाव आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. दोन तास युद्ध थांबवलं आणि भारतीय नागरिकांना सुखरुप भारतात आणलं. हे आपण विसरु शकत नाही. जे लोक विदेशात जाऊन मोदींची बदनामी करतात, अशा लोकांना आपण कसा पाठिंबा द्यायचा? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

शिंदे विरोधकांवर टीका करत म्हणाले, आता भारताचं नाव जगात पोहोचलं आहे. याआधी पाकिस्तानने हल्ले केले, तेव्हाचे प्रधानमंत्री इंग्लंडमध्ये जाऊन म्हणायचे यावर काहीतरी विचार केला पाहिजे. त्यांना काहीतरी समज दिली पाहिजे. आता मोदी म्हणतात, पाकिस्तानने असं काही केलं तर पाकिस्तानात घुसून मारू. एकीकडे देशभक्ती आहे. देशाच्या विकासाचा अजेंडा आहे. दुसरीकडे फक्त मोदी द्वेष आहे. मोदी हटाव अशी घोषणा करणारे हरले. मोदी तर सत्तेत बसले. त्या लोकांनी खोटं नरेटिव्ह पसरवून जे केलं, त्यांना जागरूक होऊन उत्तर द्या.

हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं हे सरकार आहे. लोकसभा निवडणुकीत काही लोकांनी फेक नरेटिव्ह सेट केले. खोट्या नरेटिव्हच्या माध्यमातून चुकीचे गैरसमज पसरवले. घटना बदलणार, संविधान बदलणार, आरक्षण रद्द होणार, अशी भीती पसरवली. २०१५ ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संविधानदिन साजरा केला. केंद्र आणि राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडनमधील घर स्मारक बनवलं.

जगाला हेवा वाटेल असं इंदू मीलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आपण उभारत आहोत. जोपर्यंत सूर्य, चंद्र राहिल, तोपर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं नाव राहिल. पण गावागावात काही लोक गेले, त्यांनी फेक नरेटिव्ह पसरवला. संविधान बदलणार म्हणून यांना ४०० जागा पाहिजेत, एसी-एसटीचं आरक्षण जाणार असा प्रचार करण्यासाठी आदिवासी पाड्यांमध्ये लोकं गेली, असंही शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com