संसदेत पंतप्रधान मोदींनी परिधान केलेलं निळे जॅकेट चर्चेत; वैशिष्ट्ये नेमकं काय? वाचा सविस्तर
Admin

संसदेत पंतप्रधान मोदींनी परिधान केलेलं निळे जॅकेट चर्चेत; वैशिष्ट्ये नेमकं काय? वाचा सविस्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्यावेळी निळ्या रंगाचे जॅकेट घातलेले होते जे फार विशेष होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्यावेळी निळ्या रंगाचे जॅकेट घातलेले होते जे फार विशेष होतं. कारण हे जॅकेट कोणत्याही कापडापासून बनवलेले नसून प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करुन तयार केलेल्या धाग्यापासून बनवलं आहे. यासाठी सुमारे 15 प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला आहे.

यादरम्यान रंगरंगोटी करताना पाण्याचा वापर केला जात नाही. सामान्य कापडाप्रमाणे शिवून ड्रेस तयार केला जातो. जॅकेटसह संपूर्ण ड्रेस तयार करायचा असल्यास 28 प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करणं आवश्यक आहे. या प्रक्रियेतून जॅकेट तयार करण्यासाठी फक्त 2 हजार रुपये खर्च येतो.कापड तामिळनाडूच्या करुर शहरातील कंपनीने तयार केलं आहे. श्री रंग पॉलिमर्स नावाच्या या कंपनीने पेट बॉटलच्या पुनर्वापरातून बनवलेले 9 वेगवेगळ्या रंगांचे कपडे इंडियन ऑइलला पाठवले होते.

हे जॅकेट दोन दिवसांपूर्वी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (IOC) पंतप्रधान मोदींना बंगळुरुमध्ये आयोजित इंडिया एनर्जी वीकमध्ये भेट दिलं होतं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com