पंतप्रधान मोदी आज मुंबईत; दक्षिण मुंबईसह उपनगरातील वाहतुकीत महत्त्वाचे बदल

पंतप्रधान मोदी आज मुंबईत; दक्षिण मुंबईसह उपनगरातील वाहतुकीत महत्त्वाचे बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज, १० फेब्रुवारी रोजी मुंबईतील वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज, १० फेब्रुवारी रोजी मुंबईतील वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज, १० फेब्रुवारी रोजी पूर्वनियोजित कामांसाठी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईसह पश्चिम उपनगरातील काही मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या दुपारी २.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) इथं दोन वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथून मोदी मुंबईत पोहोचणार आहेत. मुंबईत पोहोचल्यानंतर विमानतळावरून ते थेट सीएसएमटीच्या दिशेनं रवाना होतील.

मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्वीटच्या माध्यमातून वाहतुकीतील बदलाची माहिती दिली आहे. त्यानुसार कुलाबा, रिगल जंक्शन आणि पी डमेलो रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) पर्यंतच्या वाहतुकीवर दुपारी २ ते ४ या वेळेत काही प्रमाणात परिणाम होईल. त्याचबरोबर, देशांतर्गत विमानतळ ते मरोळपर्यंत उन्नत मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीत दुपारी ४ ते संध्याकाळी ६ या वेळेत किंचित बदल केला जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com