भावी पिढीला तयार करण्यासाठी त्यांना सभागृहात जास्त संधी द्यावी; मोदींचे सर्वपक्षियांना आवाहन

भावी पिढीला तयार करण्यासाठी त्यांना सभागृहात जास्त संधी द्यावी; मोदींचे सर्वपक्षियांना आवाहन

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार झाली आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार झाली आहे. सात डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत 23 दिवसांचे हे हिवाळी अधिवेशन असणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात संसदेच अधिवेशन होणार होते. मात्र, गुजरात निवडणुकीमुळं हे अधिवेशन उशीरानं सुरु होत आहे.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मोदी म्हणाले की, “मी सर्व पक्षाचे अध्यक्ष आणि सभागृह नेत्यांना आवाहन करतो की, नवे किंवा तरुण खासदार यांच्या उज्वल भविष्यासाठी आणि भावी पिढीला तयार करण्यासाठी त्यांना जास्त संधी द्यावी. त्यांचा सहभाग वाढला पाहिजे.सभागृहात होणारा गोंधळ, स्थगिती यामुळे खासदारांचं नुकसान होत असल्याचं मला अनेकांनी सांगितलं आहे. आम्हाल जे शिकायचं आहे, समजून घ्यायचं आहे त्यापासून आम्ही दूर राहतो अशी त्यांची खंत आहे. त्यामुळे सभागृहाचं काम चालणं महत्वाचं आहे.

देशाला जी-२० परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. जागतिक मंचावर भारताने ज्याप्रकारे आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ज्याप्रकारे अपेक्षा वाढल्या आहेत, तसंच जागतिक मंचावर भारत ज्याप्रकारे आपला सहभाग वाढवत आहे, अशावेळी जी-२० चं अध्यक्षपद मिळणं भारतासाठी मोठी संधी आहे,” नवे किंवा तरुण खासदार यांच्या उज्वल भविष्यासाठी आणि भावी पिढीला तयार करण्यासाठी त्यांना सभागृहात जास्त संधी द्यावी. त्यांचा सभागृहाच्या कामकाजातील सहभाग वाढला पाहिजे. सभागृहात होणारा गोंधळ, स्थगिती यामुळे खासदारांचं नुकसान होत असल्याचं मला अनेकांनी सांगितलं आहे. त्यांच्या वेदना तुम्ही समजून घ्या असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षाच्या प्रमुखांना आणि सभागृह नेत्यांना केलं आहे.

यासोबतच “विरोधी पक्षातील खासदारांचंही स्थगिती, गोंधळ यामुळे चर्चेत बोलण्याची संधी मिळत नसल्याचं म्हणणं आहे. सर्व पक्षाचे नेते, सभागृह नेत्यांनी खासदारांच्या वेदना समजून घेतल्या पाहिजे. देशाला त्यांच्या उत्साह, अनुभवाचा निर्णय प्रक्रियेला फायदा झाला पाहिजे. लोकशाहीसाठी हे गरजेचं आहे. हे अधिवेशन फायदेशीर ठरावं यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत,” असे मोदींनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com