ताज्या बातम्या
PM Narendra Modi : महाकुंभातील संगम आणि सरयू नदीचे पवित्र पाणी, राम मंदिराची प्रतिकृती; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या या खास भेटवस्तू
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पाच देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी (3 जुलै 2025) त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे पोहोचले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पाच देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी (3 जुलै 2025) त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे पोहोचले. या दरम्यान ते द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या उच्च नेतृत्वाशी चर्चा करतील. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद-बिसेसर यांना महाकुंभातील संगम आणि सरयू नदीचे पवित्र पाणी तसेच राम मंदिराची प्रतिकृती भेट दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या दौऱ्यात पंतप्रधान कमला प्रसाद-बिस्सेसर यांना "बिहार की बेटी" (बिहारची कन्या) म्हटले. भारतीय समुदायाशी बोलताना पंतप्रधान मोदींनी सांगितले की, देशाच्या पंतप्रधानांचे पूर्वज बिहारमधील बक्सरचे होते आणि त्यांनी त्या ठिकाणाला भेटही दिली आहे.