Pm Narendra Modi
Pm Narendra Modi

"सत्ता घ्या आणि मलाई खा...हाच काँग्रेस-'इंडिया' आघाडीचा मंत्र", चंद्रपूरच्या सभेत PM नरेंद्र मोदी कडाडले

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रचाराचा नारळ फोडला.
Published by :

स्थिरता विरुद्ध अस्थिरता अशी ही निवडणूक आहे. भाजप विरुद्ध इंडिया असा हा संघर्ष आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा मंत्र आहे, सत्ता घ्या आणि मलाई खा. इंडिया आघाडीने देशाला अस्थिरतेत टाकलं आहे. स्थिर सरकार किती चांगलं असंत, हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. विरोधकांनी फक्त कुटुंबाचा विकास केला. मलाईदार पोस्ट कुणाच्या खात्यात आहेत, हे सर्वांना माहित आहे. महाराष्ट्राच्या हिताचा प्रकल्प पाहून, ते म्हणायचे कमिशन द्या नाहीतर प्रकल्प थांबवा. या लोकांनी जलयुक्त शिवार योजना बंद केली. समृद्धी महामार्गाचं मी लोकार्ण केलं त्याचाही या लोकांनी विरोध केला होता. मुंबई मेट्रोचं काम थांबवलं होतं. पीएम आवास योजनेच्या माध्यमातून गरिबांना मिळणाऱ्या घरालाही यांनी विरोध केला होता.काँग्रेसच्या काळात सतत दहशतवादी हल्ले झाले, असा आरोप करत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोली मतदारसंघाचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारसभेसाठी अबकी बार ४०० पार, विजय संकल्प सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोदींनी जनतेला संवाद साधताना विरोधकांवर हल्लाबोल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे नेते पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

मोदी पुढे म्हणाले, या लोकांनी जलयुक्त शिवार योजना बंद केली. समृद्धी महामार्गाचं मी लोकार्ण केलं त्याचाही या लोकांनी विरोध केला होता. मुंबई मेट्रोचं काम थांबवलं होतं. पीएम आवास योजनेच्या माध्यमातून गरिबांना मिळणाऱ्या घरालाही यांनी विरोध केला होता. विकास वेगाने पूर्ण होत आहे. नियत चांगली असेल तर शेवटही चांगला होतो. मोदी कोणत्याही शाही कुटुंबात जन्माला आला नाही. मोदी गरिब घराण्यात जन्माला येऊन लोकापर्यंत पोहोचला आहे.

दलित, आदिवासींच्या घरी पाणी, वीज नव्हती. शिक्षणापासून वंचित राहावं लागतं होतं. या समस्या सोडवण्यासाठी मोदी सरकार काम करेल, अशी मोदी सरकारने गॅरंटी दिली होती, आम्ही ८० कोटींहून अधिक लोकांना मोफत रेशन देत आहोत. ५० कोटींहून अधिक लोकांना पाच लाख रुपयांचं मोफत उपचार मिळत आहे. देशात दहशतावाद्यांना समर्थन कोण देत होता, असा सवाल उपस्थित करत मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला.

माता महाकालीच्या पावन भूमीत शक्तीला नमन करतो. देशात गरमीचा तापमान वाढत आहे. तुमचा उत्साह आणि जोशात काहीच कमी नाही. पुन्हा एकदा मोदी सरकार, असं चंद्रपूरकरांनी निर्धार केला आहे. चंद्रपूरमधून एवढं प्रेम मिळणं माझ्यासाठी विशेष गोष्ट आहे. भव्य राम मंदिर निर्माणासाठी चंद्रपूरमधून लाकडू मिळालं. संसदेच्या बांधकामातही चंद्रपूरचंच लाकूड लागलं आहे. मी चंद्रपूरच्या नागरिकांचं आभार मानतो. सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, असंही मोदी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com