Narendra Modi
Narendra Modi

"दहशतवाद्यांनी हल्ला केल्यावर काँग्रेस जगाला सांगत होतं, आम्हाला वाचवा...वाचवा"; PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

जे सरकार स्वत: कमकुवत असेल, ते देशाला मजबुती कशी देणार, कमकुवत सरकार मजबूत देश बनवू शकतं का? असा सवाल उपस्थित करत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर घणाघात केला आहे.
Published by :

ही निवडणूक भारताच्या स्वाभिमानाची आहे. तुम्ही दहा वर्षांपूर्वीचा काळ पाहिला आहे. तुम्ही आताचाही काळ पाहत आहेत. जग त्या भारताला ओळखत आहे, जो जगाच्या विकासाला गती देत आहे. ज्या देशाचा चांद्रयान जिथे पोहचतो, तिथे कुणीच पोहचू शकत नाही. भारत एकत्रितपणे १०० सॅटेलाईट पाठवतो. भारत गगनयानाला आंतराळात पाठवण्याची तयारी करत आहे. ज्या भारताने मेड इन इंडिया कोरोना व्हॅक्सीन बनवली. भारताने जगातील कोट्यावधी लोकांचा जीव वाचवला. मोठ मोठ्या युद्धातून भारताने आपल्या नागरिकांना सुरक्षीत बाहेर काढलं आहे. याआधी असं काही झालंय का, याआधी दहशतवादी हल्ला करून पळत होते, तेव्हा काँग्रेसचं सरकार झोपलं होतं. काँग्रेस जगात जाऊन सांगत होतं, वाचवा, आम्हाला वाचवा. जे सरकार स्वत: कमकुवत असेल, ते देशाला मजबुती कशी देणार, कमकुवत सरकार मजबूत देश बनवू शकतं का? असा सवाल उपस्थित करत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर घणाघात केला आहे. मोदी महायुतीच्या सभेत धाराशिवमध्ये बोलत होते.

मोदी काँग्रेसवर टीका करताना म्हणाले, ज्यांचं स्वत:चं अस्तित्व नाही, ती काँग्रेस सरकार भारताला नवी उंची देणार का? विश्वासघात हीच काँग्रेस पक्षाची ओळख आहे. मराठवाड्याच्या भूमीलाही काँग्रेसने एकच गोष्ट दिली आहे, ती म्हणजे विश्वासघात. काँग्रेस ६० वर्ष सत्तेत होती, पण शेतकऱ्यांच्या शेतात पाणी दिलं नाही. मराठवाड्यात जलयुक्तशिवार योजना कुणी थांबवली, अशा लोकांना तुम्ही मत देणार का? मोदी समस्यांवर दुर्लक्ष करत नाही, मोदी समस्यांना टक्कर देतो. प्रत्येक घरात पाणी पोहोचवणं, हे मोदींचं मिशन आहे.

दहा वर्षात मोदींनी पाण्यासाठी जेव्हढं काम केलंय, तेव्हढं काम काँग्रेसने ६० वर्षात केलं नाही. फक्त पाच वर्षात मोदींनी महाराष्ट्रात ७५ लाखांहून जास्त घरांना नळाचं कनेक्शन दिलं आहे. काँग्रेस इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या बंगल्यात पाणी येत होतं. म्हणून त्यांना तुमची काळजी नव्हती. गेल्या कित्येक वर्षांपासून सिंचन योजन रखडल्या होत्या. आमचे सहकारी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात वेगानं विकासकामे होत आहेत. धाराशिवच्या शेतकऱ्यांच्या खात्यात ८०० कोटी रुपये एनडीए सरकारने पाठवले आहेत. काँग्रेसच्या सरकारने शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेला वंदन करतो. तुळजा भवानी मातेनं छत्रपती शिवाजी महाराजांना विजयी होण्याचा आशीर्वाद दिला होता. आज मी या भूमीत आई तुळजा मातेचा आणि जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. आशीर्वाद शक्तीशाली आणि विकसीत भारत बनवण्यासाठी आहे. तुमचा आशीर्वाद देशातील विकासाची गॅरंटी बनला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com