संसदेतील घुसखोरीवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; केलं मोठं विधान

संसदेतील घुसखोरीवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; केलं मोठं विधान

13 डिसेंबर 2023 रोजी संसदेतील घटनेने देशात चिंतेचे वातावरण पसरले. देशाच्या विविध भागातील काही तरुणांनी संसदेत घुसखोरी केली.
Published by :
shweta walge

13 डिसेंबर 2023 रोजी संसदेतील घटनेने देशात चिंतेचे वातावरण पसरले. देशाच्या विविध भागातील काही तरुणांनी संसदेत घुसखोरी केली. स्मोक क्रॅकर्सचा वापर केला. तानाशाहीविरोधात घोषणा दिल्या. एका तरुणाचा तर संसद परिसरात जाळून घेण्याचा मनसूबा पण समोर आला. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

पीएम मोदी म्हणाले की, संसद परिसरात झालेली घटना चिंताजनक आहे आणि याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. तपास यंत्रणा या घटनेचे गंभीरतेने चौकशी करत आहे. यासोबतच पंतप्रधान मोदींनी अशा विषयांवर प्रत्येकाने वादविवाद किंवा विरोध टाळावा, असेही पंतप्रधान म्हणाले.

एक वृत्तपत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखत दिली. ” संसदेत जी घटना घडली. ही घटना हलक्यात घेऊ नका. त्यामुळेच लोकसभेचे अध्यक्ष ही गांभीर्याने याविषयीचे ठोस पाऊल टाकत आहेत. तपास यंत्रणा कठोरतेने तपास करत आहे. या घटनेमागे कोण आहे, त्यांचे मनसुबे काय आहे. याची सखोल चौकशी गरजेची आहे. अशा विषयावर वाद-विवाद टाळणे हितकारक आहे. अशा मुद्यांवर समाधानकारक मार्ग शोधणे आवश्यक आहे.”

संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत घोडचूक झाली आहे. भाजप खासदाराच्या ओळखपत्रावर तरुण संसद परिसरात घुसले. त्यांनी काय केले हे उभ्या जगाने पाहिले. त्यांनी हा प्रकार का केला. त्याच्या मागे कोण आहे. सुरक्षा व्यवस्थेचा मोठा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांनी राज्यसभा आणि लोकसभेत सरकारची बाजू स्पष्ट करावी. या मुद्यावर चर्चा व्हावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. याप्रकरणी गोंधळ घातल्याने दोन्ही सभागृहातील सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिसांच्या चौकशीत आता अनेक धक्कादायक बाबी पुढे येत आहे. या घटनेचा मास्टरमाइंड ललित झा याने पोलिसांना उलट तपासणीत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. संसदेत शिरण्याची योजना अयशस्वी झाली असती तर गुन्हेगारांकडे बॅकअप प्लॅन अर्थात प्लॅन बी तयार होता, असे झा याने पोलिसांना सांगितले असल्याचे समजते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com