Pmc Mayoral Election When Will Pune Get A New Mayor
Pmc Mayoral Election When Will Pune Get A New Mayor

PMC Mayoral Election : पुण्याच्या राजकारणात नवा अध्याय? महापौर निवडणुकीची तारीख जाहीर, सत्ता कोणाच्या हाती?

राज्यातील महानगरपालिकांमध्ये आता सत्तास्थापनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारने महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी टप्प्याटप्प्याने कार्यक्रम ठरवला.
Published by :
Riddhi Vanne
Published on

राज्यातील महानगरपालिकांमध्ये आता सत्तास्थापनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारने महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी टप्प्याटप्प्याने कार्यक्रम ठरवला असून, त्यानुसार सर्व महापालिकांमध्ये पहिल्या सभेची तयारी सुरू आहे. लवकरच नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली बैठक घेण्यात येणार आहे.

सरकारी वेळापत्रकानुसार 27 आणि 28 जानेवारी रोजी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर जानेवारीच्या अखेरीस विशेष सभा घेऊन मतदान होईल आणि नव्या महापौर-उपमहापौरांची नावे जाहीर केली जातील. ही प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने आवश्यक व्यवस्था केली आहे.

यंदा राज्यातील बहुतांश महापालिकांच्या निवडणुका एकाच वेळी झाल्यामुळे, मुंबई वगळता इतर शहरांसाठी समान कार्यक्रम आखण्यात आला आहे. मुंबईत मात्र राजकीय आणि तांत्रिक कारणांमुळे महापौर निवड फेब्रुवारीच्या सुरुवातीस होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुण्यात महापौरपद महिला उमेदवारासाठी राखीव असल्याने भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी वाढली आहे. महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असल्याने पुण्याचा नवा महापौर भाजपचाच असेल, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

थोडक्यात

  1. राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये सत्तास्थापन प्रक्रियेला सुरुवात.

  2. सरकारकडून महापौर व उपमहापौर निवडीसाठी टप्प्याटप्प्याने कार्यक्रम जाहीर.

  3. त्या कार्यक्रमानुसार महापालिकांमध्ये पहिल्या सभेची तयारी सुरू

  4. लवकरच नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली अधिकृत बैठक होणार.

  5. पहिल्या सभेत महापौर–उपमहापौर निवडीची प्रक्रिया पार पडण्याची शक्यता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com