PM Modi
PM Modi

विधानसभेच्या यशानंतर पंतप्रधानांचा दुसरा महाराष्ट्र दौरा

विधानसभेच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या दुसरा महाराष्ट्र दौरा असणार आहे. महापालिका निवडणुकांच्या आधी दौऱ्याला विशेष महत्त्व आहे.
Published by :
Published on

विधानसभेच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दुसरा महाराष्ट्र दौरा आहे. महापालिका निवडणुकांच्या आधी होत असलेल्या या दौ-यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. त्यातच पंतप्रधान महायुतीतील आमदारांची शाळा घेणार आहेत. त्यामुळे या दौ-याला विशेष महत्त्व आहे.

थोडक्यात

  • विधानसभेच्या यशानंतर पंतप्रधानांचा दुसरा महाराष्ट्र दौरा

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्रात

  • महापालिका निवडणुकांपूर्वी मोदींच्या दौ-याला विशेष महत्त्व

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौ-यावर आहेत. ते नैदलाच्या आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर या नौदल युद्धनौका देशाला अर्पण करणार आहेत. मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये सकाळी साडेदहाच्या सुमारास हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर ते नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचं लोकार्पण करणार आहेत.

देशाच्या सागरी सुरक्षेची ताकद वाढणार

- आयएनएस सूरत पी15बी मिसाईल डिस्ट्रॉयर प्रकल्पाचं चौथं आणि शेवटचं जहाज

- जगातील सर्वात मोठ्या आणि आधुनिक डिस्ट्रॉयरपैकी एक जहाज

- जहाजाची 75 टक्के बांधणी स्वदेशी सामग्रीतून

- आयएनएस निलगिरी पी17ए स्टेल्थ फ्रिगेट प्रकल्पातील पहिलं जहाज

-भारतीय युद्धनौका डिझाईन विभागाकडून निर्मिती

- संकटकाळी तगून राहण्याची क्षमता

- आयएनएस वाघशीर पी75 स्कॉर्पिन प्रकल्पाची सहावी आणि अंतिम प्रकारातील पाणबुडी

- फ्रान्स नौदलाच्या समूहाच्या सहकार्यानं बांधणी

लोकार्पणाचा कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान महायुतीतील सर्व आमदारांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षाच्या आमदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होणा-या संवादाबाबत थेट पत्र धाडून कळवण्यात आलं आहे. अडीच तास आमदारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करतील.

पंतप्रधान नेमकं काय विचारणार?

- आमदारांची काम करण्याची पद्धत कशी आहे?

- केंद्र आणि राज्य सरकारी योजनांची मतदारसंघात अंमलबजावणी कशी करता?

- राज्य आणि केंद्राच्या योजनांचे मतदारसंघात लाभार्थी किती?

- योजनांची अंमलबजावणी करताना येणा-या अडचणी?

- योजनांमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात कोणते बदल झाले?

सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com