Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली

मनोज जरांगे पाटील हे 8 जूनपासून उपोषणाला बसणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटील हे 8जूनपासून उपोषणाला बसणार आहेत. त्यांच्या या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याची माहिती मिळत आहे. आचारसंहितेमुळे 4 तारखेला पोलिसांनी परवानगी नाकारल्या नंतर मनोज जरांगे पाटील यांनी 8 तारखेला उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली होती.

अंतरवलीच्या गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले निवेदन आणि जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता तसेच ग्रामपंचायतच्या कामांना अडथळा आणि महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेता ही परवानगी नाकारण्यात आली आहे.

तसेच उपोषणाच्या जागे बाबत ग्रामसभेचे कोणतेही कागदपत्र सादर न केल्या मुळे त्यांना ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com