सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली.
Published by :
Team Lokshahi

सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली. याच पार्श्वभूमीवर आता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी मोठी माहिती समोर येत आहे. गुजरातमधील भुजमध्ये 2 आरोपींना घेतलं ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

हे आरोपी पनवेलमधल्या हरिग्राममधील एका अपार्टमेंटमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी या आरोपींना आता ताब्यात घेतलं आहे. त्यांनी वापरलेली बाईक सुध्दा पनवेल मधून खरेदी केली असल्याचे तपासातून समोर आलं आहे. गेल्या एक महिन्यापासून हे दोन आरोपी हे हरिग्राम गावातील एका अपार्टमेंटमध्ये रहायला होते. अशी माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com