ताज्या बातम्या
Santosh Deshmukh Case : पोलिसांनी वाल्मिक कराडसह इतर आरोपींचे सीडीआर काढला
संतोष देशमुख हत्या प्रकरण: पोलिसांनी वाल्मिक कराडसह इतर आरोपींचे सीडीआर काढले, तपासात मोठी मदत
यामध्ये वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले प्रतीक घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, कृष्णा आंधळे, महेश केदार, सिद्धार्थ सोनवणे यांचे सीडीआर काढण्यात आले आहेत तर त्याचे टावर लोकेशन देखील मिळाले आहेत, वाल्मीक कराड तीन सिम कार्ड वापरत होता तर कृष्णा आंधळे चार सिम कार्ड वापरत होता, अशी माहिती मिळत आहे तर या तपासामध्ये या सीडीआरची मोठी मदत मिळणार आहे.
संतोष देशमुख यांची हत्या 9 डिसेंबर रोजी करण्यात आली त्या दिवशी हे सर्व आरोपी नेमके कुठे होते हे एकमेकांना कॉल करत होते कशा पद्धतीने हे संतोष देशमुख यांना मारहाण करत होते त्याचबरोबर एकमेकांना फोनवरून संपर्क करत होते तर कोणत्या टॉवरवरून ते संपर्क करत होते याची देखील माहिती आता जे दोषारोपपत्र दाखल केले आहे त्याच्यातून सध्या समोर येत आहे.