कोट्यावधींच्या गैरव्यवहार प्रकरणी पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ बँकेला पोलिसांची नोटीस
Admin

कोट्यावधींच्या गैरव्यवहार प्रकरणी पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ बँकेला पोलिसांची नोटीस

बीडच्या परळीतील वैद्यनाथ बँकेतील कोट्यावधींच्या गैरव्यवहार प्रकरणी बँकेला पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

विकास माने, बीड

बीडच्या परळीतील वैद्यनाथ बँकेतील कोट्यावधींच्या गैरव्यवहार प्रकरणी बँकेला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. कळंब येथील शंभू महादेव कारखान्याच्या लिलावात अटी शर्तीचा उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केली जाणार आहे. भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे मुख्य मार्गदर्शक आणि खासदार प्रीतम मुंडे या बँकेवर संचालक आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील शंभू महादेव कारखान्याच्या लिलावात अटी शर्तीचा उल्लंघन केल्याचा आरोप बँकेवर असून पोलिसांच्या नोटीसीमुळे खळबळ उडाली आहे. बँकेचे सभासद सुभाष निर्मळ यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात अर्ज देऊन गैरव्यवहाराची चौकशी करून गुन्हा नोंदवण्याची मागणी केलीय. आणि याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 31 जानेवारी रोजी सक्षम हजर होऊन कागदपत्रांसह खुलासा करावा असं या नोटिसीमध्ये नमूद करण्यात आलंय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com