Mumbai : 'या' तारखेपासून मुंबईत पाणीकपातीची शक्यता

Mumbai : 'या' तारखेपासून मुंबईत पाणीकपातीची शक्यता

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावातील पाणीसाठा वेगाने कमी होत असून केवळ 48 टक्के पाणीसाठी शिल्लक असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आता मुंबईत 1 मार्चपासून 10 टक्के पाणीकपातीची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर आता भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील पाणीसाठा मिळावा अशी मागणी मुंबई महानगरपालिकेने राज्य सरकारकडे पत्राव्दारे केली आहे.

मुंबईकडे पाणीसाठा 48% आहे. हा साठा 15% वर गेल्यानंतर पाण्याच्या रिझर्व स्टॉकची गरज भासते. भातसा, अप्पर वैतरणा मधील अतिरिक्त साठा मुंबई महापालिकेने जलसंपदा खात्याकडे मागितलाय. दरवर्षी हा साठा मागितला जातो. असे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com