Mumbai : 'आमचं ठरलंय, लालबाग परळची एकच शान, धनुष्यबाण'; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर लालबागमध्ये पोस्टरबाजी
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Mumbai ) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. यातच काल उद्धव ठाकरे लालबागमध्ये आले होते. याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यानंतर लालबागमध्ये पोस्टरबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
'आमचं ठरलंय, लालबाग परळची एकच शान, धनुष्यबाण', 'जनतेला हवा सामान्य माणूस, राजपुत्र नाही' असे म्हणत लालबागमध्ये पोस्टरबाजी करण्यात आली असून पोस्टरच्या माध्यमातून शिवसेनेनं ठाकरेंना डिवचल्याचे पाहायला मिळत आहे. या पोस्टरची आता चर्चा रंगली आहे.
Summary
उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर लालबागमध्ये पोस्टरबाजी
'आमचं ठरलंय, लालबाग परळची एकच शान, धनुष्यबाण'
'जनतेला हवा सामान्य माणूस, राजपुत्र नाही'
