Vishwanath Bhoir
Vishwanath BhoirTeam Lokshahi

प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी कोणत्या हिंदुत्वात बसते हा संशोधनाचा विषय - विश्वनाथ भोईर

शिवसेना पक्षाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष केलं आहे.

सुरेश काटे, कल्याण: प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर संजय राऊत यांनी आमची अपेक्षा आहे की, आंबेडकर हे भविष्यात महाविकास आघाडीचे घटक होतील. त्यामुळे या आघाडीतील प्रमुख स्तंभ प्रमुख नेते त्यांच्याविषयी सगळ्यांनी आदर ठेवावं अस आवाहन केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व वंचित बहुजन आघाडी यांची युती झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता पसरल्याचे दिसून येतेय. या युती बाबत शिंदे गटातील आमदारांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष केलं होतं. याबाबत बोलताना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष केलं आहे.

आमदार भोईर म्हणाले की, सत्ता संघर्ष झाला. सगळे आमदार, शिवसैनिक बाहेर पडले आणि नवीन बाळासाहेबांची शिवसेना पक्ष स्थापन झाला. उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणताही नेता उरलेला नाही. ते दररोज एकेकाला प्रवेश देत असतात तर रोज सांगतात आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत. प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी कोणत्या हिंदुत्वात बसते हा संशोधनाचा विषय आहे. ही अनैसर्गिक युती आहे. कुठेतरी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना नमवन्यासाठी कुणालातरी पक्षात घ्यायचं, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवला असं बोलायचं. यांना कोणत्याही उद्योग नसल्याने ते हे करणारच असा टोला आमदार भोईर यांनी लगावला आहे.

Vishwanath Bhoir
शरद पवारांवर टीका करु नये हा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला तरच मानेन; आंबेडकरांचा राऊतांवर निशाणा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com