Praniti Shinde : गेले 10 वर्ष जी काही आश्वासनं आपल्याला भाजपकडून मिळाली त्याची काही पूर्तता होऊ शकली नाही

Praniti Shinde : गेले 10 वर्ष जी काही आश्वासनं आपल्याला भाजपकडून मिळाली त्याची काही पूर्तता होऊ शकली नाही

लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता सोलापुरात मॉर्निंग वॉक प्रचार करण्यात आला. यावेळी काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, माझा संवाद साधणे हे वर्षभर चालूच असते. गेले 15 वर्ष मी लोकांशी संवाद साधते आहे. आज मला मॉर्निंग वॉकला इथं सर्वांनी बोलवले. एक युद्ध लढत आहे. ही लढाई फक्त माझी नाही. आपल्या सगळ्यांची आहे.

सोलापूर महानगरपालिकेचे गेल्या दोन वर्षापासून निवडणुका नाही. सोलापूर शहरात पाणी देखील विस्कळीत आहे. आठ दिवसांनी पाणी येतं. जे पाणी येतं ते पण घाण पाणी येतं. सोलापूर शहरातला जो रोजगाराचा प्रश्न आहे, विमानसेवेचा प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न आहेत. हे सगळं विषय घेऊन मी निवडणूक लढत आहे. गेले 10 वर्ष जे काही आश्वासन आपल्याला भाजपकडून मिळाली त्याची काही पूर्तता होऊ शकली नाही. नवख्या लोकांना आणलं सत्ता दिली.

भाजपच्या खासदारांकडून संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे. ही आम्हाला संविधान बदलायचं आहे. लोकांचा वापर फक्त सत्तेत येण्यासाठी केला गेला. पण आता लोक फसणार नाही. लोक योग्य तो निर्णय घेतील. नेहमी जेव्हा भाजपाचे उमेदवार कुठेही असतात. ते नेहमी जो मुद्दा आहे तो मुद्दा न घेता वळून दुसरा मुद्दा लोकांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असतात. आमच्या सोलापूरची लोक ही हुशार आहेत. मुद्दावर बोला की मागच्या 10 वर्षात तुम्ही काय केलं. असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com