Praniti Shinde : मागच्या दहा वर्षात सोलापुरात जे भाजपचं खासदार होते, त्यांनी काहीही सोलापूरसाठी केलं नाही

Praniti Shinde : मागच्या दहा वर्षात सोलापुरात जे भाजपचं खासदार होते, त्यांनी काहीही सोलापूरसाठी केलं नाही

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता सोलापूर लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस उमेदरवार प्रणिती शिंदे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, मागच्या दहा वर्षात सोलापूरात जे भाजपचं खासदार होते. त्यांनी काहीही या सोलापूरसाठी केलं नाही. ना साधी पाईपलाईन आणू शकले, ना एक रोजगार आणू शकले, ना साधी विमानसेवा सुरु करु शकले. महागाईही कमी करु शकले नाही.

तसेच प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, जे वचन आपल्याला दिलेलं की महागाई कमी करु किंवा 2 कोटी रोजगार उपलब्ध करुन देऊ ते काहीही या ठिकाणी भाजप सरकारकडून झालं नाही. म्हणून आज जेव्हा त्यांचे उमेदवार येतात तेव्हा मागच्या 10 वर्षात काय काम केलं ते दाखवू शकत नाही आहेत आणि म्हणून जो प्रचार असतो त्याचे विषयांतर करुन दुसरीकडे घेऊन जाण्याचा त्यांचे षडयंत्र आहे. आज सोलापूरची जनता त्यांना सांगते आहे की मुद्द्याचे बोला. मागच्या 10 वर्षात तुम्ही काय केलं. हे या ठिकाणी सांगा आणि मुद्यावर आम्ही त्यांना आणणार आहोत.

अनेक असे प्रश्न आहेत, अनेक असे वचन आहेत. जे भाजप सरकारने दिलेत पण त्याची पूर्तता होऊ शकली नाही. लोकांचा फक्त वापर केला गेले मताधिक्यासाठी, लोकांना दिशाभूल करण्यात आलं. ज्या लोकांनी त्यांना प्रेमापोटी मतदान केलेलं आज त्याच लोकांचा विश्वासघात होत आहे. लोक आता भोळी नाही आहेत. लोक हुशार आहेत आणि 100 टक्के या वेळेस लोक त्यांना त्यांची जागा दाखवतील असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com