Bharat Gogawale : 'पालकमंत्री गोगावले होणार आम्हाला खात्री' शिंदेंच्या शिवसेनेतून 'या' नेत्याचा मोठा दावा

रायगड, नाशिक पालकमंत्रीपदाचा तिढा अजून सुटलेला नसताना शिंदेंच्या शिवसेनेतील नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री होणार असा दावा केला आहे.
Published by :
Prachi Nate

रायगड, नाशिक पालकमंत्रीपदाचा तिढा अजून सुटलेला नाही आहे. पालकमंत्रिपदावरुन अनेक चर्चा सुरु आहेत. यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील पाहायला मिळत आहे. अशातच भरत गोगावले आणि दादा भूसे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला नव्हते.

यावर आणि रायगड पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावर बोलताना शिंदेंच्या शिवसेनेतील नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की,"काही कारणास्तव भरत गोगावले या बैठकीला हजर राहू शकले नाही. आमच्यात कोणाचीही नाराजी नाही आहे".

"परंतू एक गोष्ट मात्र नक्की 15 ऑगस्टचा जो झेंडावंदनचा कार्यक्रम आहे, हा पुर्ण राज्यासाठी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री नाहीत त्या जिल्ह्यामध्ये कोणी कोणी झेंडावंदन कराव यासाठी काढलेला आहे. त्यामुळे पालकमंत्रीबाबत वादाचा काही विषय नाही. आमची मागणी पालकमंत्री पदाची आहे आणि पालकमंत्री भरत गोगावले होणार याची आम्हाला खात्री आहे".

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com