Manipur : मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर
मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर झाला आहे. राष्ट्रपती राजवट लावण्यावर लोकसभेत एकमत झालं आहे. मध्यरात्री राष्ट्रपती राजवटीबाबत लोकसभेत चर्चा झाली आणि त्यानंतर राष्ट्रपती राजवट लावण्याबाबतचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर करण्यात आला आहे.
यावेळी अमित शाह म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा अर्थ लावण्यावरून दोन समुदायामध्ये जातीय हिंसा झाली. सर्वांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. तिथे टेक्निकल, वैद्यकीय शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. प्राथमिक शिक्षणासाठी वर्ग लावले आहेत. औषधे आणि जेवणाची व्यवस्था तेथे करण्यात आली आहे. जेव्हा जातीय हिंसा होते तेव्हा हे प्रश्न उपस्थित होतात. याला पक्षाशी जोडू नका. आम्ही असे नाही म्हणत की, तुमच्या काळात जास्त झालं, आमच्या काळात कमी झालं, पण हिंसा होताच नये.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रात्री 1 वाजून 59 मिनिटांनी मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीला अनुमोदन देण्याचा प्रस्ताव ठेवला.