Presidential Election 2022
Presidential Election 2022Team Lokshahi

Presidential Election 2022 : देशाचे नवीन राष्ट्रपती 21 जुलै रोजी ठरणार

18 जुलै रोजी मतदान होणार, निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा
Published by :
Shweta Chavan-Zagade

राष्ट्रपतींच्या निवडणुकीसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक (Presidential election) आज जाहीर झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) पत्रकार परिषद घेऊन निवडणूक तारखांची घोषणा केली. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. तर 21 जुलै रोजी देशाचे नवीन राष्ट्रपती कोण असणार, हे निश्चित होणार आहे.

Presidential Election 2022
पंकजा मुंडेंचे तिकीट कापले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया...
Presidential Election 2022
राज्यसभा निवडणुकीत नवाब मलिक, अनिल देशमुख मतदान करणार का? कायदा काय सांगतो?

विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपुष्टात येत आहे.

निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर केल्यानंतर राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मतांसाठी देशातील सर्व राज्यांचा दौरा करू शकतात. मागील वर्षी झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जवळपास 50 टक्के मतदान एनडीएचे उमदेवार रामनाथ कोविंद यांच्या बाजूने झाले होते. काही प्रादेशिक पक्षांनीदेखील कोविंद यांना पाठिंबा दिला होता.

मुदत २४ जुलै रोजी संपली

संविधानाच्या अनुच्छेद ६२ नुसार राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत होणे आवश्यक आहे.

हे लोक मतदान करू शकतात

संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांव्यतिरिक्त, सर्व राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले आमदार, राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमधील आमदार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करू शकतात. राज्यसभा, लोकसभा किंवा विधानसभेच्या नामनिर्देशित सदस्यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार नाही.

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचे निकष काय?

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी काही पात्रता निकष आहेत. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार हा भारतीय नागरीक असावा आणि त्याचे वय 35 हून अधिक असावे. त्याशिवाय, त्याला किमान 100 आमदार, खासदारांचा पाठिंबा असावा. यामध्ये 50 सूचक आणि 50 अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करतात. हे आमदार, खासदार थेट निवडून आलेले प्रतिनिधी असावेत. एका उमेदवाराला अधिकाधिक चार नामांकने दाखल करता येतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com