Chandrakant Patil : 'भाजप-शिवसेना युतीसाठी केंद्र-राज्यातून दबाव'; चंद्रकांत पाटील यांचे संकेत
सांगली – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना युतीबाबत जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहेत. भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत बोलताना यासंदर्भात महत्त्वाचे विधान केले. पाटील म्हणाले की, केंद्रातून आणि राज्यातून 29 महापालिकांसाठी शिवसेना आणि भाजप युती झाली पाहिजे, असा स्पष्ट संदेश आणि आग्रह असून, भविष्यातील निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या युतीवर भर दिला जात आहे.
सांगली महापालिकेत भाजपाचा महापौर
चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, सांगली महापालिकेत भाजपचा महापौर होणार आहे, आणि त्यासाठी योग्य ती तयारी सुरु आहे. तसेच, चांगली महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाबरोबर युती होण्याचे संकेत देखील त्यांनी दिले.
पाटील यांच्या या विधानामुळे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत नवीन घडामोडी रंगल्या असून, शिवसेना शिंदे गट आणि भाजप युतीवर राजकीय वर्तुळात चर्चेचा वेग वाढला आहे.
राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे की, या युतीमुळे महापालिकांमध्ये भाजप-शिंदे गटाच्या राजकीय ताकदीत वाढ होऊ शकते, तर विरोधकांसाठी ही मोठी आव्हान ठरू शकते.
