पंतप्रधान मोदींच्या आई हिराबेन यांच्यावर गांधीनगरमध्ये होणार अंत्यसंस्कार

पंतप्रधान मोदींच्या आई हिराबेन यांच्यावर गांधीनगरमध्ये होणार अंत्यसंस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या आई हिराबेन मोदी ( Heeraben Modi ) यांचं निधन झालं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या आई हिराबेन मोदी ( Heeraben Modi ) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. स्वत: पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या निधनाची माहिती ट्विट करत दिली आहे. पीएम मोदी म्हणाले, "तेजस्वी शतक ईश्वराच्या चरणी विसावत आहे... आईमध्ये मला ते त्रिमूर्ती नेहमीच जाणवते, ज्यामध्ये एका तपस्वीचा प्रवास, निस्वार्थी कर्मयोगी आणि मूल्यांसाठी वचनबद्ध जीवनाचे प्रतीक आहे. समाविष्ट केले आहे". असे त्यांनी लिहिले.

हीराबेन यांनी अहमदाबाद येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आईच्या निधनाची बातमी मिळताच पंतप्रधान मोदी अहमदाबादला रवाना झाले आहेत. हिरा बा यांचा मृतदेह मुलगा पंकज मोदी यांच्या घरी आणण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पंकज मोदी यांचे गांधी नगर येथे घर आहे. पीएम मोदींच्या आई हीराबेन यांच्या पार्थिवावर गांधी नगरमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com