वर्ध्यातील आर्वीत 40 एकरात पंतप्रधान मोदींची सभा

वर्ध्यातील आर्वीत 40 एकरात पंतप्रधान मोदींची सभा

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

भूपेश बारंगे, वर्धा

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच वर्ध्यातील आर्वीत 40 एकरात पंतप्रधान मोदींची सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सभा वर्धा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांची प्रचारासाठी आयोजित केली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या सभेची तारीख अद्यापही निश्चित झाली नाही आहे मात्र आर्वी शहराच्या बाजूला असलेले 40 एकर मैदानावर साफसफाई, झाडेझुडपे काढण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या मैदानाची पाहणी पोलीस महानिरीक्षक दोरजे,पोलीस अधीक्षक नुरुल हसन, कार्यकारी अभियंता सोळुंखे,आमदार दादाराव केचे यांनी पाहणी केली. हेच मैदान सभेसाठी व्यवस्थित असून या मैदानाची निवड करण्यात आली आहे. या मैदानाच्या शेजारी दोन हेलिपॅड बनवण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याची माहिती समोर येत आहे. या जागेची पाहणी केल्यानंतर ही जागा सोयीची असल्याने या मैदानाची निवड केली असून येथे जवळपास सात ते आठ जेसीबी, रोलर, यंत्रणेच्या साहाय्याने मैदानाची साफसफाई केली जात आहे. लवकरच सभेची तारीख घोषित होणार असल्याची माहिती आमदार दादाराव केचे यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com