पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे 28 मेला उद्घाटन
Admin

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे 28 मेला उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 28 मे 2023 रोजी हे नवे संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 28 मे 2023 रोजी हे नवे संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. संसदेच्या सध्याच्या इमारतीत लोकसभेत 550 तर राज्यसभेत 250 सदस्य बसण्याची व्यवस्था आहे. संसदेच्या नव्या वास्तूत लोकसभेत 888 आणि राज्यसभेत 384 सदस्यांसाठी आसनव्यवस्था करण्यात आली आहे. नवीन संसद भवनात सेंट्रल हॉल नसेल, त्याऐवजी कमिटी हॉल असेल. यामध्ये एक अतिशय सुंदर संविधान कक्ष बनवण्यात आला आहे. याशिवाय विश्रामगृह, वाचनालय, कॅन्टीन आदी सुविधा उपलब्ध असणार आहे.

तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आणि संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी त्यांनी पंतप्रधानांना निमंत्रित केले. हे जुन्या संसद भवनापेक्षा 17,000 चौरस मीटर मोठे बांधले गेले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com