आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उज्जैनच्या महाकालेश्वर कॉरिडॉरचे उद्धाटन

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उज्जैनच्या महाकालेश्वर कॉरिडॉरचे उद्धाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उज्जैनच्या महाकालेश्वर कॉरिडॉरचे उद्धाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या गुजरात दौऱ्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये जाणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उज्जैनच्या महाकालेश्वर कॉरिडॉरचे उद्धाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या गुजरात दौऱ्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये जाणार आहेत. महाकाल प्रांगणात 108 खांब तयार करण्यात आले आहेत. याचे कारण म्हणजे सनातन धर्मात 108 हा क्रमांक खूप महत्त्वाचा आहे. त्यावर भगवान भोलेनाथ आणि शक्ती यांच्या प्रतिमा कोरल्या आहेत. याशिवाय कार्तिकेय आणि गणेशाची मूर्तीही कोरलेली आहे.

मोदी जेव्हा उद्घाटनासाठी पोहचतील तेव्हा 600 साधू मंत्रोच्चार आणि शंखनाद करणार आहेत. कॉरिडोरच्या प्रवेशद्वारावर 20 फूट उंच धाग्यापासून शिवलिंग तयार करण्यात आले आहे. महाकाल पथावर 108 स्तंभ आहेत. या स्तंभांवर शंकराच्या आयुष्यावर आधारित विविध शिल्प साकारण्यात आली आहेत.

संध्याकाळी 5 वाजता ते उज्जैनच्या महाकालेश्वरच्या मंदिरात जाणार असून त्या ठिकाणी देवाचं दर्शन घेणार आहेत आणि पूजा करणार आहेत. त्यानंतर ते उज्जैनच्या महाकालेश्वर कॉरिडॉरचे उद्धाटन करणार आहेत. उज्जैन हे भारतीय वेळेच्या गणनेचे केंद्र होते आणि महाकाल ही उज्जैनची प्रमुख देवता मानली जात असे. भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक उज्जैन येथे स्थित महाकालेश्वर मंदिर आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com