ताज्या बातम्या
Coastal Road : Lokशाही मराठीच्या बातमीची'पंतप्रधान कार्यालयाकडून दखल
मुंबई सागरी किनारा मार्गावरील डांबरी उंचवट्यांमुळे पंतप्रधान कार्यालयाने घेतली दखल, लोकशाही मराठीच्या बातमीमुळे पालिका प्रशासनाकडे विचारणा
मुंबई महापालिकेचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या मार्गावरील डांबरी उंचवट्यांमुळे या रस्त्याची दुर्दशा झाल्याची ध्वनीचित्रफित समाज माध्यमांवर फिरत होती.
या चित्रफितीची पंतप्रधान कार्यालयानेही दखल घेतली असून याबाबत पालिका प्रशासनाकडे विचारणा केली. कोस्टल रोडवर पॅचवर्कची बातमी लोकशाही मराठीनं दाखवताच त्याची दखल थेट पंतप्रधान कार्यालयानं घेतली आहे.
मुंबईच्या सागरी किना-यावर मास्टिकचं काम करण्यात आल्याचं पंतप्रधान कार्यलयानं स्पष्ट केलं आहे. मुंबई किनारी कोणतेही खड्डे नसल्याचंही पंतप्रधान कार्यालयानं म्हटल आहे. मात्र, रस्त्यावर पॅचवर्क केल्यानं उंचवटे तयार झाले असून, त्याचा त्रास वाहन चालकांना होत असल्याचं वृत्त लोकशाही मराठीनं दाखवलं होतं