मुंबईतील धक्कादायक प्रकार; मुख्याध्यापकाचं विद्यार्थिनीसोबत घाणेरडं कृत्य

मुंबईतील धक्कादायक प्रकार; मुख्याध्यापकाचं विद्यार्थिनीसोबत घाणेरडं कृत्य

मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील नागपाडा परिसरातील एका नामंकित शाळेच्या मुख्यध्यापकाने शाळेतील विद्यार्थीनीचाच विनंयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पीडित मुलीने या घटनेची माहिती घरातल्यांना दिल्यानंतर हे प्रकरण समोर आले. या प्रकरणी नागपाडा पोलिस ठाण्यात रविवारी मुख्यध्यापक अजुंम खान (५५) विरोधात कलम 376(2)एफ, 376(3), 354,506 भादवि सह कलम 4,8,12 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीला मुख्याध्यापक त्याच्या कॅबिनमध्ये बोलावून तिच्याशी मागील अनेक महिन्यांपासून अश्लील चाळे करत असल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. तसेच कुणाला सांगितल्यास पीडित मुलगी तिच्या मित्रासोबत फिरत असल्याची माहिती घरातल्यांना सांगण्याची धमकी मुख्यध्यापक देत असे. असे तिने सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com